मरावे परी अवयवरुपी उरावे

यवतमाळ :-  अवयवदान म्हणजे नेमके काय ? कुणीही अवयवदान करु शकते का? अवयवदानाची प्रक्रीया काय? मृत्युपश्चात शरीरातून प्राण गेले असले तरी काही अवयव हे मृत्युनंतर काही काळासाठी सक्रीय असतात, ते दुसऱ्याच्या शरीरात बसवले तर त्या व्यक्तीला अवयवांचा फायदा होवु शकतो. आज अवयवांची आवश्यकता असलेल्यांची प्रतिक्षा यादी वाढत चालली आहे. यात बदल घडवायचा असेल तर अवयवदानाबाबत जनसामान्यांच्या माणसिकतेत बदल होणे आवश्यक असून जास्तीत जास्त व्यक्तींनी यासाठी पुढे येणे आवश्यक आहे.

केंद्र शासनाने देशातील अवयवप्राप्ती वितरणाची कार्यक्षम आणि संघटीत प्रणाली विकसित करण्यासाठी आणि देणगीदारांची राष्ट्रीय नोंदणी ठेवण्यासाठी नॅशनल ऑरगन ॲण्ड टीशु ट्रान्सप्लान्ट ऑरगॅनिझशन ही सर्वोच्च संस्था स्थापण केली आहे. त्या अंतर्गत प्रादेशिक आणि राज्यस्तरावर तत्सम संस्थांची स्थापणा केली आहे. देशामध्ये अवयवदानाबद्दल जागरुकता, अवयवदानाशी संबंधित समज व गैरसमज दुर व्हावे आणि मृत्युनंतर अवयव व उतींचे दान करण्यासाठी नागरिकांत प्रेरणा व अवयवदानाचे मुल्य रुजावे या उद्देशाने दि.३ ऑगस्ट हा दिवस भारतीय अवयवदान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

कोणत्या अवयवांचे दान करु शकतो?

जीवंत व्यक्ती फक्त आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठीच अवयव दान करु शकतो. रुग्ण दात्यांचा जवळचा नातेवाईक म्हणजे मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण अथवा पती किंवा पत्नी असावा लागतो. या व्यतिरिक्त कोणत्याही रुग्णासाठी अवयव दान करायचे असल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते. जिवंत व्यक्ती फक्त काही मर्यादित अवयवाचेच म्हणजे मुत्रपिंड अथवा यकृताचा काही भाग दान करु शकतो.

मृत व्यक्ती जिची हृदय क्रिया बंद पडली आहे, फक्त नेत्र व त्वचा या अवयवांचे दान करु शकतो. मृत व्यक्तीत हृदयक्रिया बंद पडल्यामुळे इतर अवयवांना रक्त पुरवठा थांबलेला असतो व हे अवयव प्रतिरोपणासाठी बाद ठरतात. परंतु मृत व्यक्ती जिची हृदयक्रिया चालु आहे म्हणजे ‘जिचा मस्तीष्कस्तंभ मृत्यु (ब्रेन डेड) झाला आहे अशी व्यक्ती मुत्रपिंड, फुप्फुसे, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडी, नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानाचे ड्रम यांचे देखिल दान करु शकते.

मस्तीष्कस्तंभ मृत्यु (ब्रेन डेड) म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीची चेतना व श्वासोच्छवास कायमस्वरुपी बंद झाल्यास त्याला मृत घोषित करता येते. परंतु चेतना व श्वासोच्छवास या दोन्हीचे केंद्र आपल्या मेंदूतिल मस्तीष्कस्तंभ या भागात असते. अपघातात डोक्याला मार लागल्याने, मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने अथवा मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर मस्तीष्कस्तंभास कायमस्वरुपी ईजा झाल्यास त्या व्यक्तीचा मस्तीष्कस्तंभ मृत्यु होवु शकतो.

एखाद्या व्यक्तीचे अतिदक्षता विभागात उपकरणांच्या सहाय्याने हृदय कृत्रिमरित्या क्रियाशिल ठेवले असेल व काही ठराविक व प्रमाणित चाचण्यांच्या आधारे जर तिचा मस्तीष्कस्तंभ मृत झाल्याचे निश्चित झाले तर त्या व्यक्तीस मृत घोषित करता येते. अशा व्यक्तीचे हृदय जास्तीत जास्त ३६ ते ७२ तासापर्यंत कृत्रिमरित्या क्रियाशिल ठेवता येते व याच कालावधीत प्रमुख अंतर्गत अवयवांचे दान होवु शकते. यासाठी जवळच्या नातेवाईकांची संमती आवश्यक असते. असे अवयवदान फक्त शासनाने प्रत्यारोपणासाठी मान्यता दिलेल्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मस्तीष्कस्तंभ मृत्यु झाल्यासच होवु शकते.

अवयवदानानंतर मस्तीष्कस्तंभ मृत्यु व्यक्तीचे शरीर दिले जाते का?

मस्तीष्कस्तंभ मृत्यु (ब्रेन डेड) व्यक्तीचे अवयव काढल्यानंतर त्याचे शरीर सन्मानपुर्वक त्याच्या नातेवाईकांना अंतिम विधीसाठी परत दिले जाते. अवयवदान व देहदान या दोन्हीमध्ये फरक आहे. देहदानामध्ये मृताचे शरीर वैद्यकीय प्रशिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ठेवुन घेतले जाते. अवयवदानामध्ये सदर अवयव प्रत्यारोपणासाठी वापरले जाते.

अवयवदान केल्याने मस्तीष्कस्तंभ मृतदात्याच्या शरीरावर काही विदृपता येते का?

मस्तीष्कस्तंभ मृत (ब्रेन डेड) दात्यास ऑपरेशन थेअटरमध्ये नेऊन त्याचे अवयव काळजीपुर्वक काढले जातात व शरीरावर विदृपता येत नाही. एखाद्या जिवंत व्यक्तीची शस्त्रक्रिया जितक्या काळजीपुर्वक केली जाते तितक्याच काळजीपुर्वक अवयव काढले जातात व जखमा पुन्हा शिवल्या जाते. शरीरावर, पोटावर अथवा छातीवर शस्त्रक्रिया केल्याचे टाके मात्र राहतात.

अवयवदानासाठी कुठे संपर्क साधावा

अवयवदान अणि ऑनलाईन प्रतिज्ञा संदर्भात अधिक माहीतीसाठी NOTTO च्या www.notto.abdm.gov.in या संकेतस्थळावरील वेबपोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रतिज्ञेद्वारे जास्तीत जास्त नोंदणी करावी. सदर नोंदणी परिशिष्ट १ मध्ये संलग्न क्युआर कोड स्कॅन करुन वेब पोर्टलवर देखिल करता येईल. अधिक माहीतीसाठी NOTTO च्या कॉल सेंटरशी टोलफ्री हेल्पलाईप क्रमांक १८००-११-४७७० यावर संपर्क साधावा, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सुखदेव राठोड यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाद्वारे मेडिकल चौक व महाल परिसरात अतिक्रमण निर्मूलन कारवाई

Fri Aug 2 , 2024
नागपूर :- नागपूर शहरातील फुटपाथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात नागपूर महानगरपालिकेद्वारे सर्वत्र धडक कारवाई सुरू आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार संपूर्ण शहरातील कारवाईला गती देण्यात आली आहे. मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वात नागपूर महानगरपालिकेच्या प्रवर्तन विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणच्या अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई केली जात आहे. गुरुवार(ता: १) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय समोर आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com