मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत आस्थापनांसाठी कार्यशाळा

गडचिरोली :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनंतर्गत महास्वयम पोर्टलवर पदे अधिसूचित करणे व उमेदवार नोंदणीची प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 2 ऑगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या योजनेचा लाभ घेवू इच्छिणाऱ्या सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांनी यावेळी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

महसूल सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सर्व शासकीय कार्यालय, महामंडळ, सहकारी बँका व औद्योगिक आस्थापनांचे प्रमुख, गोंडवाना विद्यापीठ व विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य यांचेसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी या योजने अंतर्गत विविध शासकीय कार्यालयात व औद्योगिक आस्थापनेत रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केले असल्याचे कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज संकेतस्थळावर भरावे – मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह

Fri Aug 2 , 2024
गडचिरोली :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व गतीमान करण्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in/signup हे संकेत स्थळ सुरु करण्यात आले असून लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावर अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे. या योजनेसाठी 31 जुलैअखेरपर्यंत 1 लाख 52 हजार 327 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 37 हजार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com