नागपूर :- महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक ( वनबल प्रमुख ) या पदावरून आज जागतिक वनसंरक्षक दिनी आपली कारकीर्द यशस्वीपणे पार पाडून शैलेश टेंभुर्णीकर सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्त छोटेखानी निरोप समारंभ केंद्रीय अध्यक्ष डॉ. अजय पाटील यांचे नेतृत्वात महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेद्वारे आयोजित करण्यात आला.
वन सेवेत रुजू झाल्यापासून लोकाभिमुख कार्य, कनिष्ठ वन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य, उत्कृष्ट संवाद कौशल्य, विविध विषयावर गाडा अभ्यास, संवाद साधण्यास कायम तत्पर, वन विकास व वनसंवर्धन याची कामे करण्यास अहोरात्र तयार, प्रशासनावर पकड या विविध गुणांमुळे आपली अमिट छाप सुरुवातिच्या सेवा कारकिर्दीपासून निर्माण करणारे वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर सेवानिवृत्त होत आहेत. वनविभागाचा कणा असलेले वनरक्षक वनपाल या कनिष्ठ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या अडचणी समस्या सोडविण्याकरिता प्रिय असलेले, क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांचे लाडके अधिकारी म्हणून ख्याती असलेले वनबल प्रमुख सेवानिवृत्त होत असल्यामुळे वनरक्षक वनपालामध्ये आपले कैवारी सोडून जात असल्याची भावना निर्माण झालेली आहे.
वनबाल प्रमुख पदाचे प्रभार स्वीकारल्यापासून संघटनेच्या मागणीनुसार वनरक्षक वनपाल यांचे वेतनश्रेणीत वाढ होण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवून कायम पाठपुरावा केला, पोलीस विभागाप्रमाणे वन विभागातील वन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना भरती प्रक्रियेत पाच टक्के आरक्षण, कॅशलेस हॉस्पिटलायजेशन, गवती कुरण मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, वन्यजीवांसाठी पाणवट्याची निर्मिती करणे, मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाय योजना व Artificial Intelligence चा वापर, वन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वस्तीगृह निर्माण करण्याचा प्रस्ताव, वन हद्धीच्या अभिलेखाचे डिजिटलायझेशन, वन कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिले , प्रवास भत्ता बिले तात्काळ काढण्यासाठी प्रयत्न वन कर्मचार्यांशी हितगुज करण्याकरिता वनसंवाद उपक्रमाची सुरुवात, वनविभागाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध योजना राबविणे इत्यादी कार्य पार पाडल्यामुळे आज समाधानाने सेवानिवृत्त होत असून पुनर्जन्म झाल्यास पुन्हा वन अधिकारी म्हणून सेवा करण्याची इच्छा असल्याची भावना शैलेश टेंभुर्णीकर यांनी आपले मनोगतात व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ अजय पाटील यांच्या हस्ते शैलेश टेंभुर्णीकर यांना सन्मान चिन्हासह श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या संपूर्ण सेवाकाळात वनरक्षक वनपाल यांचे भावना, अडचणी समजून घेऊन तात्काळ निकाली काढण्याच्या आपल्या स्वभाव गुणामुळे आपण वनरक्षक वनपाल यांच्यात लाडके अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते, सेवानिवृत्त झाल्या नंतरही आपण आमच्या कायम स्मरणात राहाल अशा भावना याप्रसंगी डॉ.अजय पाटील यांनी व्यक्त केल्या.
संघटनेच्या निरोप समारंभाच्या शिष्टमंडळात माधव मानमोडे, सुधीर फडके, तानाजी भुजबळ, विशाल मंत्रीवार, सुनील सावंत, भारत मडावी, प्रवीण बोबाटे, संभाशिव घोडके, पंकज देवरे, सिद्धार्थ मेश्राम, अजिनाथ भोसले, संदीप भोसले, संजय माघाडे, ललित उचीबंगले, आनंद तिडके, सतीश गडलिंगे नितीन गडपायले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते