मुंबई :-अर्थसंकल्पात ग्रामीण भारताच्या विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच युवांसाठी 50 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याचा निर्णयही अर्थसंकल्पातून मांडण्यात आला. याव्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प तळागाळातील लोकांना आणि शेवटच्या घटकांना दिलासा देणारा असून सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मनं जिंकणारा अर्थसंकल्प ठरला आहे. शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधणारा, समाजातील दुर्बल, वंचित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा असून सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा, मजबूत-विकसित भारताची पायाभरणी करणारा, देशाला विश्वशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.