विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत 1293 मतदारांची नावे वगळली

चंद्रपूर :- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याकरीता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुषंगाने सदर कार्यक्रमाअंतर्गत 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एकुण 1293 (1 फेब्रुवारी 2024 ते 30 जून 2034) मतदारांची नावे वगळण्यात आली असुन या नावांची यादी चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयीन नोटीस बोर्डवर पाहण्यास उपलब्ध आहे.

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार मतदान केंद्राच्या नावात बदल, ठिकाणात बदल, पत्यात बदल करुन घेता येईल. उपरोक्त सर्व दुरुस्तीसह 25 जुलै रोजी एकत्रीकृत मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रसिध्द केलेल्या मतदार यादीवर दावे व हरकती सादर करता येईल. याच कालावधीत शनिवार आणि रविवार विशेष शिबिर आयोजित करण्यात येईल. विशेष शिबिराच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत नमुना क्र. 6. 7 आणि 8 स्वीकारतील व दि. 19 ऑगस्ट पर्यंत आलेल्या सर्व अर्जावर निर्णय घेऊन दावे व हरकती निकाली काढण्यात येऊन 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार 71 चंद्रपूर विधानसभा मतदार संघात एकुण 1293 (1 फेब्रुवारी 2024 ते 30 जून 2034) मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. सदर यादी ही मनपा मुख्य कार्यालय, ३ झोन कार्यालये, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ( बीपीएल ऑफीस ),सरकारी दवाखान्यामागे, कस्तुरबा रोड ज्युबली शाळेसमोर अश्या ५ ठिकाणी नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सहायता केंद्रात वाढ

Tue Jul 16 , 2024
– मनपातर्फे ३६ केंद्रात स्वीकारले जात आहेत अर्ज – सुटीच्या दिवशीही सुरु राहणार केंद्रे  चंद्रपूर :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी चंद्र्पुर महानगरपालिकेतर्फे यापूर्वी ५ सहायता केंद्रांची स्थापना करण्यात आली होती मात्र,योजनेस मिळणार प्रतिसाद व होणारी गर्दी बघता आणखी ३१ केंद्रे सुरु करण्यात आली असुन आता एकुण ३६ केंद्रांवर नागरिकांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करता येणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com