जातिनिहाय जनगणना करण्यासाठी 7 जिल्ह्यातून मंडलयात्रा काढणार – उमेश कोर्राम

– ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी जनजागृती अभियानाअंतर्गत विदर्भातील 7 जिल्ह्यात

– 03 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2024 पर्यंत जातीनिहाय जनगणनेसाठी मंडल यात्रा (वर्ष तिसरे)

नागपूर :- केंद्र सरकार द्वारे ७ ऑगस्ट 1990 रोजी मंडल आयोग लागू करण्यात आला. याद्वारे ओबीसी समाजाला आरक्षण प्राप्त झाले. मंडल आयोगाच्या शिफारिशीमुळे वंचित ओबीसी समाज मुख्य प्रवाहात येत आहे. ७ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात मंडल दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या औचितत्याने जातीनिहाय जनगणनेचा महत्त्वाचा विषय घेऊन मंडळ यात्रा काढण्यात येत आहे. असे पत्रकारांना सांगितले. ओबीसी समाजाकडून अनेक वर्षापासून जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली जात आहे. परंतु केंद्र तथा राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. 1931 च्या जनगणनेनुसार ओबीसी समाजाची लोकसंख्या 52% होती. परंतु 1931 पासून तर आज पर्यंत जातिनिहाय जनगणना न झाल्यामुळे खरी लोकसंख्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय परिस्थिती समजून येत नाही जर भारताला महासत्ता बनायचे असेल तर सर्व घटकांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. विकासाच्या दृष्टीने धोरण ठरविण्यासाठी भारत सरकारकडे डेटा असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने भारताची जातिनिहाय जनगणना करावी. यासाठी ओबीसी, एससी, एसटी, समाजात जनगणना झालीच पाहिजे. या उद्देशाने मंडल यात्रेचे आयोजन ३ अगस्त ते ७ ऑगस्ट या दरम्यान करण्यात आले असून एकूण जिल्ह्यातून मंडल यात्रा काढणार असल्याची माहिती यावेळी दिली. यात्रेची सुरुवात ३ ऑगस्ट रोजी – सविधान चौक नागपूर, जिल्ह्यातून सुरुवात होऊन विदर्भातील नागपूर मार्गाने वर्धा जिल्ह्यातील जाम हिंगणघाट वाणी चंद्रपूर ब्रम्हपुरी भंडारा गोंदिया या जिल्ह्यातून जाणार आहे या यात्रेचा समारोप गोंदियात होत मुख्य शहरासोबतच ग्रामीण भागातून सुद्धा मार्गक्रमण करणार असल्याची माहिती उमेश कोर्राम यांनी पत्र परिषदेत दिली. विविध मागण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे.

*मंडल यात्रेच्या मागण्या*

१) ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा. २) मराठ्यांचे सरसकट ओबीसीकरण करु नये. ३) महाज्योती संस्थेस १००० कोटी रुपयाचा निधी द्या. ४) इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे सर्व जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय, अधिकारी, ओबीसी भवन निर्माण करा. ५) नोकर भर्तीत कंत्राटीकरण, खाजगीकरण बंद करा. ६) शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी दया. ७) घरकुल योजनेचे आर्थिक सहाय्य ५ लाख रुपये करा. ८) ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व व्यवसायिक, बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमात १००% शिष्यवृत्ती दया. ९) ओबीसींचा एक लाख पदांचा बॅकलॉग तात्काळ भरा. या मागणी. सह यात्रा काढण्यात येत आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये उमेश कोर्राम मुख्य संयोजक मंडल यात्रा, पंकज सावरबांधे, पियुष आखरे, कृतल आखरे, राहुल वाढई, यर्जुवेद सेलोकर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor releases Marathi version of Raghavendra Swamy's ShriKrishna Charitrya Manjiri'

Thu Jul 11 , 2024
Mumbai :-Maharashtra Governor Ramesh Bais released the Marathi commentary of the ‘Shrikrishna Chatritrya Manjiri’ originally written in the 17th Century by Shri Raghavendra Swamy of Mantralayam at Raj Bhavan Mumbai on Wed (10 July). Chief Pontiff of the ‘Mantralayam’ Shri Raghavendra Swamy Mutt Swami Subudhendra Teertha, trustee of the Mumbai Mutt Ramakrishna Terkar and translator Prof Gururaj Kulkarni were prominent […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com