संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात शासन स्तरावरून कोणतेही कारवाई होत नसल्याने महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार कामठी तहसील महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने काल 10 जुलै ला काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले तर आज 11 जुलै ला तहसील कार्यालय समोर नारे निदर्शने करण्यात आले तर उद्या 12 जुलै ला शुक्रवारी लेखणीबंद आंदोलन केले जाणार तर 15 जुलै पासून बेमुद्दत कामबंद आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनाबाबत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना तालुका कामठी च्या वतीने तहसीलदार गणेश जगदाळे यांना आधीच निवेदन देण्यात आले. निवेदन देताना माधुरी उईके, सुनीता जाधव,ज्योती दोरसेटवार,मंगला दिवटेलवार,संगीता तेलपांडे, डडमल,भुपेंद्र निमकर,अमोल पौड, प्रेम खुपसे, सुखदेव बोडी, नितीन टेंभुरने, ममता कांबळे,सुनीता डेकाटे, वसुंधरा मानवटकर,रेखा उबरकर आदी उपस्थित होते.