नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते सोमवारी(ता: ८) नागपूर शहरातील जनतेच्या/विद्यार्थ्यांच्या सोयीकरीता ऑनलाईन पासेस, ऑनलाईनबस ट्रॅकिंग, ऑनलाईन शहर बस तिकीटींग व यु.पी.आय. द्वारे शहर बस तिकीट घेण्याच्या योजनेचे लोकापर्ण करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल प्रामुख्याने उपस्थित होत्या.
असा घ्या लाभ
सदर सेवेचा लाभ घेण्यास्तव लाभार्थ्यांकडे अॅन्ड्रॉईड/आय.ओ.एस. मोबाईल असणे गरजेचे आहे. नागरीकांनी आपल्या अॅन्ड्रॉईड अथवा आय.ओ.एस. मोबाईल मधील प्ले स्टोर/ॲप स्टोर मध्ये जाऊन “चलो ॲप” सर्च करुन सदर ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावा. यानंतर शहर बस तिकीटींग अथवा ऑनलाईन पासेसची आवश्यकते प्रमाणे निवड करुन त्याची सुविधा प्राप्त करुन घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे
ऑनलाईन पासेस करीताआवश्यक दस्ताऐवज जसे चालु शैक्षणिक सत्राचे शाळा/कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा/कॉलेजचे आय.डी. कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो इ. अपलोड करणे आवश्यक आहेत. याशिवाय सामान्य नागरीकांना सुद्धा मासिक/तिमाही पासेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ज्या नागरीकांकडे अॅन्ड्रॉईड अथवा आय.ओ.एस. मोबाईल नाही त्यांनी मनपाचे पास काऊंटरवर जाऊन बस पास काढणे गरजेचे आहे. त्याकरीता नागपूर शहरात खालील तीन ठिकाणी बस तिकीट पास सेंटर उघडण्यात आलेले आहे.
इथे आहे सोय
1.सीताबर्डी डेपो, 3 रा माळा मोदी नं 2 जवळ मनिष मार्केट बिल्डींग
2. वाडी डेपो, सी, एन.जी. पंप च्या मागे वाडी नाका – 10
3. हिंगणा डेपो, वासुदेव नगर मेट्रोस्टेशन च्या बाजुला
मनपाद्वारे शहर बस सेवेमध्ये पासेस करीता उपलब्ध करुन देण्यात आलेली उपरोक्त ऑनलाईन पासेसची सेवा अत्यंत उपयोगी व फायदेशिर असून, लाभार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेता येऊ शकेल.
शाळकरी विद्यार्थी/विद्यार्थिनी व सर्व साधारण जनतेला बस तिकीटींग व बस पासेस करीता करावी लागणारी धावपळ यापुढे होणार नसल्यामुळे व यामुळे वेळेची बचत होणार असल्यामुळे जनतेने या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन मनपाचे परिवहन व्यवस्थापक गणेश राठोड यांच्याद्वारे करण्यात आले आहे.