नागपूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोंबिंग ऑपरेशन असल्याने पो. स्टे मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, भंडारा नागपूर रोडने एक पिवळ्या रंगाचा टिप्पर क्रमांक MH 40 CT 4109 मध्ये विनापरवाना गौन खनिज रेती भंडारा येथून भरून नागपूर कडे जाणार आहे. अशा मिळालेल्या विश्वसनीय खवर वरून स्टाफचे मदतीने नाकाबंदी करून टिप्पर क्रमांक MH 40 CT 4109 चा चालक आरोपी नामे- बबन गोविंदा कोहडे, वय ५५ वर्ष, रा. मासगाव त. गोरेगाव जि. गोंदीया यास थांबवुन स्टाफने पाहणी केली असता वाहनामध्ये अंदाजे ०८ ब्रास रेती (गौणखनिज) मिळून आल्याने सदर टिप्पर चालकास टिप्पर मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती (गौणखनिज) ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीच्या ताब्यातून टिप्पर क्रमांक MH 40 CT 4109 किंमती २५,००,०००/- रू. मध्ये आठ ब्रास रेती किंमती ३२,०००/-रू. असा एकूण २५,३२,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे-१) बबन गोविंदा कोहडे, वय ५५ वर्ष, रा. मासगाव त. गोरेगाव जि. गोंदीया २) मालक अजय डीगरसकर रा. नागपूर यांचेविरुद्ध पोस्टे मौदा येथे कलम ३०३ (२) ४९ भा. न्याय. सं. सहकलम ४८(८) महसुल अधी. कलम ४, २१ खान व खनिज अधि. कलम ३ संपत्ती नुकसान प्रती. कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीची मेडिकल तपासणी करून जप्ती मुद्देमालासह पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. मौदा यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोउपनि बडूलाल पांडे, ASI नाना राऊत, विनोद काळे, ईकबाल शेख, NPC संजय बरोदीया, HC मोनू शुक्ला यांनी पार पाडली.