संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी, भीम पत्रिका चे संपादक, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी, साहित्यिक राजनेता, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्युच्या दिवशी शासकीय नोकरी चा राजीनामा देवून सामाजिक कार्यात पुर्ण वेळ देणारे, आंबेडकरी आंदोलनाचे निष्ठावंत शिपाई, प्रसिद्ध आंबेडकरवादी लेखक श्रद्धेय लाहोरी राम बाली ( L R Balley) यांचे पंजाबच्या जालंधर येथे 6 जुलै रोजी वयाच्या ९४ वर्षी दुःखद निधन झाले असून ते राज्यसभेचे माजी उपसभापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे सोबत समता सैनिक दलाचे केंद्रीय नेतृत्व भारतभर केले आहे. या दुःखद घटनेने आंबेडकरी चळवळीचा एक महत्वपूर्ण निळा क्रांतीकारी हरपला असल्याचे मौलिक प्रतिपादन प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट चे पदाधिकारी राजेश गजभिये यांनी प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समिती तसेच आंबेडकर अनुयायी च्या वतीने कामठी बस स्टँड चौक परिसरात आयोजित श्रद्धेय एल आर बाली यांच्या सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमात व्यक्त केले.तसेच उपस्थित समता सैनिक दल कामठी चे पदाधिकारी वीरेंद्र मेश्राम यांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून श्रद्धेय एल आर बाली यांनी देशभरात बहुजन समाजाला त्यांनी एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे समयोचित वक्तव्य केले. दरम्यान परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ समाजसेविका मिराताई शंभरकर व हेमलता ताई घोडेस्वार यांच्या हस्ते माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून विशेष बुद्ध वंदना घेण्यात आली.व श्रद्धेय एल आर बाली अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी माजी नगरसेवक अविनाश उकेश,माजी नगरसेवक विकास रंगारी,माजी नगरसेवक जे डी मेश्राम,दिपंकर गणवीर, गीतेश सुखदेवें,उदास बन्सोड,आशिष मेश्राम, कोमल लेंढारे, प्रमोद खोब्रागडे,मंगेश खांडेकर,विजय जैस्वाल,वीरेंद्र मेश्राम,राजन मेश्राम,दिनेश पाटील, अनुभव पाटील,रंजन येवले,अविनाश रामटेके,विक्रांत ढोके,धीरज वंजारी,अरुण शेलारे,नितेश फकिर्डे, सुमित गायकवाड,सिद्धांत बागडे,मोहम्मद कलिम,आनंद बागडे,मनोज रंगारी, सुमित गेडाम,दुर्गेश शेंडे, धीरज नागदेवें आदी उपस्थित होते.