नागपूर :- अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ नागपूर शाखेच्या वतीने गुणवंत एसएससी व एचएसएससी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ २५ जून रोजी वंजारीनगर येथील कलवरी अलायन्स चर्च येथे आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांची मेहनत आणि यश ओळखून त्यांना मोलाचे मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीएमआयएचईआर नागपूरचे ऊप कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा उपस्थित होते. ‘मी करू शकतो का ?’ ही संकल्पना सोडून ‘मी करू शकतो” ही वृत्ती अंगिकारून अभ्यासात समर्पण आणि निष्ठेवर भर देण्याची प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. सेंट पॉल स्कूल, नागपूरचे संस्थापक व संचालक डॉ. राजाभाऊ टाकसाळे यांनीही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत पालकांची महत्त्वाची भूमिका ओळखून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक भवितव्याची बांधणीसाठी प्रेरित केले. ख्रिश्चन तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आफा ओमेगा ख्रिश्चन महासंघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.वंदना बेंजामिन यांनी खूप परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. पाद्री विठ्ठल गायकवाड, प्रकाश शेरेकर, पाद्री अमित मानवटकर, डॉ.भावना डोंगरदिवे, जयंत रायबोर्डे, पाद्री प्रकाश बेंजामिन, पाद्री बंडू धुळे, पाद्री सुधीर इंगळे, पाद्री के.बी.गवई, प्रतिभा रायबोर्डे, नीता गोपालन आणि डॉ.व्हिक्टर बेंजामिन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रचना थोरात यांनी केले तर एओसीएम विदर्भ सचिव जयंत रायबोर्डे यांनी आभार मानले. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या डॉ. वंदना बेंजामिन राष्ट्रीय अध्यक्ष (महिला) यांनी प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.