अवैध रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपीतांना अटक

पारशिवनी :- स्थानिक गुन्हे शाखा नाग्रा येथील स्टाफ पो. स्टे. पारशिवनी हद्दीत अवैध रेती संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबर द्वारे माहिती मिळाली की, मौजा डोरली येथे ट्रक द्वारे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून घटनास्थळी नाकाबंदी केली असता दोन ट्रक विनापरवाना अवैध रेती वाहतुक करताना मिळुन आले. टाटा कंपनीचा १० चक्का ट्रक क एम एच ४० वी जी ७००६ चा चालक व मालक आरोपी क्र. १) नामे अनवर मुबारक हुसेन, वय ३७ वर्ष रा. कांजी हाउस इदीरानगर नागपुर हा आपले ताब्यातील ट्रकमध्ये अवैध्यरित्या विनापरवाना डोरली शिवारातील नदीच्या पात्रातुन रेतीची चोरटी वाहतुक करताना मिळून आला. स्टाफने आरोपी क्र. १) चे ताब्यातील ट्रक क एम एच ४० वी जी ७००६ किंमती २०००००० रू. ज्यामध्ये अंदाजे ४ ब्रास रेती प्रत्येकी ५००० रू प्रमाणे एकुण २०००० रू. एकुण २०,२०,०००/- रू. चा मुद्देमाल तसेच समोरून येणारे अशोक ले लँड कपनीचा १० ट्रक क एम एच ४० ए के ७३४५ चा चालक आरोपी क्र. २) नामे दिलीप काशीनाथ निपाने वय ३७ रा वार्ड क ४ विनासंगम याने आपले ताब्यातील ट्रक यातील फिर्यादी व सोबतचे स्टाफ यांना पाहुन रीवर्स घेवुन आपला ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवित असताना फिर्यादी तसेच स्टाफने त्याचा पाठलाग केला असता सदर ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने त्याने आपला ट्रक मौजा गरंडा फाटा जवळील नाल्यात टाकुन अपघात केला. नमुद आरोपी याने सुध्दा आपल्या ताब्यातील ट्रक मध्ये आरोपी क्र. ३) पाहीजे आरोपी गाडी मालक नामे विरेंद्र प्रमेलाल ठाकरे, रा. वार्ड क. ४ बिनासंगम ता. सावनेर याचे सांगणेवरून अवैध्यरित्या बिनापरवाना डोरली शिवारातील नदीच्या पात्रातुन रेतीची चोरटी वाहतुक करून मिळुन आल्याने आरोपीचा ताब्यातुन अशोक ले लॅन्ड कंपनीचा ट्रक क एम एच ४० ए के ७३४५ किंमती २०००००० रू वा ज्या मध्ये अंदाजे ४ ब्रास रेती प्रत्येकी ५००० रू प्रमाणे एकुण २०००० रू असा एकुण दोन्ही वाहनासह ४०४००००/- रू चा माल जप्त करून वरील आरोपीता विरूध्द पोस्टे पारशिवनी येथे कलम ३७९, २७९, १०९, ३४ भा. द. वी., सहकलम १८४ मोवाका सहकलम ४८ (७) ४८(८) महा. ज. म. स. सहकलम ४, २१ खान खनिजे अधि. अन्वये पो. स्टे. पारशिवनी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपी क्र. ०१) व २) यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश भुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नाग्रा. येथील पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि किशोर शेरकी, पोहवा राजू रेवतकर किशोर वानखेडे यांनी केलेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दुखापत करण्याच्या तयारीने जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस मौदा पोलीसांनी केले अटक

Wed Jun 26 , 2024
मौदा :- अंतर्गत मौजा सावळी फाटा येथे दि. २३/०६/२०२४ मे १८/०० वा. ते १८/१५ वा. दरम्यान आरोपी नामे- १) रूपेश महेश यादव वय २० वर्ष रा. भांडेवाडी डम्पींग यार्ड जवळ नागपूर २) विधीसंघर्ष बालक यांनी संगनमत करून फिर्यादी नामे राजेश विनायक रामटेके, वय ३३ वर्ष, रा. सावळी ता. कामठी जिल्हा नागपूर याच्या भावा जवळील रेडमी कंपनीचा मोवाईल हिसकावून घेवुन पळून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!