संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- हिंदु हुदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे हयानी स्थापन केलेल्या प्रखर शिवसेना चा ५८ वा वर्धापन दिन सोहळा जय मॉ काली मंदीर सत्रापुर कन्हान येथे थाटात साजरा करण्यात आहे.
बुधवार (दि.१९) जुन ला हिंदु हुदय सम्राट स्व. मा. बाळासाहेब ठाकरे हयानी मराठी माणुस व प्रखर हिंदुत्वाची अस्मिता जपन्याकरिता १९ जुन १९६६ ला मुंबई येथे शिवसेनाची स्थपना करून एक सामाजिक चळवळ सुरू करून सर्वसामान्याच्या न्याय हक्काचा सेवाभावी लढा उभा केला. आज त्या सामाजिक व राजकिय रोपटयाचे वटवृक्ष होऊन महाराष्ट्र राज्यासह देशातील इतरही राज्यात शिवसेनेच्या शाखा स्थापना होऊन नावलौकिक प्राप्त झाला आहे.
यामुळे बुधवार (दि.१९) २०२४ ला सकाळी ११.३० वाजता सत्रापुर कन्हान येथील जय मॉ काली मंदीरात रामटेकचे माजी खासदार प्रकाश जाधव, माजी जिल्हाप्रमुख पांडुरंग बुराडे यांनी जय काली माता चरणी नमन, पुजा अर्चना करून शिवसेना (उबाठा) पक्षाची दिवसे दिवस प्रगती, उन्नती करिता प्रार्थना करून शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिवस थाटात साजरा करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे नरेश बर्वे, प्रा. अरूण वराडे, शिवसेना कुही तालुका प्रमुख प्रदिप कुल्लरकर, दिलीप राईकवार, कोठीराम चकोले, गुणवंत आंबागडे, मोतीराम रहाटे, गणेश भोंगाडे, इंदल यादव, नानाभाऊ मोहाडे, महेंद्र भुरे, युवराज ठवकर, कवडु चापले, बंटी हेटे, रूपेश सातपुते, मनोज गुडधे, देवा चतुर, राजन भिसे, रविंद्र चकोले, प्रतापसिंग राजपुत, अमोल सुटे, मुलचंद सातपैसे, गणेश ठवकर, आशिष वाढेकर सह शिवसेना (उबाठा) पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.