यवतमाळ :- विविध नामांकित कंपन्यांमधील नियुक्तीसाठी येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये शासकीय तंत्रनिकेतनच्या विविध अभियांत्रिकी शाखेतील ५६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
सदर निवड प्रक्रियेत सिमेन्स लिमिटेड औरंगाबाद, बजाज ऑटो लिमिटेड पुणे आणि भारत गियर्स लिमिटेड सातारा या कंपन्यांचा समावेश आहे. या निवड प्रक्रियेत सर्व प्रथम योग्यता चाचणी व मुलाखत घेण्यात आली.
या शिबीरामध्ये सिमेन्स लिमिटेडला विद्युत अभियांत्रिकीचे ८ विद्यार्थी, यंत्र अभियांत्रिकीचा १ विद्यार्थी निवडले गेले. बजाज ऑटो लिमिटेडमध्ये अणूविद्युत अभियांत्रिकी विभागाने १५ विद्यार्थी, विद्युत अभियांत्रिकीचे ९८ विद्यार्थी व यंत्र अभियांत्रिकीचे ९ विद्यार्थी निवडले गेले. तसेच भारत गियर्स लिमिटेडमध्ये यंत्र अभियांत्रिकीच्यि ५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या शिबीराच्या आयोजनाकरिता संस्थेचे प्राचार्य डॉ.आर.पी. मोगरे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण व शिबीराचे अधिकारी पी.एम.जाधव, एस.ये.शिरभाते अधिव्याख्याता विद्युत, जी. आर. भह अधिव्याख्याता यंत्र, एस. एस. कांबळे अधिव्याख्याता अणूविद्युत अभियांत्रिकी व संस्थेतील सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.