संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- शहरातील शिवाजी नगर येथे राष्ट्रीय बंजरग दल द्वारे ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
३५० वर्षां पूर्वी ६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून मराठी साम्राज्याचा पाया रोवला म्हणुन रायगड किल्यावर त्यांचा राज्याभिषेक करुन त्यांना छत्रपती ही पदवी बहाल करण्यात आली. याच पार्श्व भूमीवर गुरुवार (दि.६) जुन ला शिवराज्याभिषेक दिवसा निमित्त राष्ट्रीय बजरंग दल द्वारे शिवाजी नगर कन्हान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित राष्ट्रीय बजरंग दलचे समर्थक प्रकाश रोकडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन ” छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जय भवानी, जय शिवाजी ” असा जयघोष करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी अंकुश दुबे, प्रकाश रोकडे, अनुराग महल्ले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन शिवराज्याभिषेक सोहळा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थित सर्व राष्ट्रीय बजरंग दल समर्थकां नी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पि त आणि विनम्र अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळा दिवस मोठ्या उत्साहाने थाटात साजरा कर ण्यात आला. याप्रसंगी प्रकाश रोकडे, ऋषभ बावणकर, अनुराग महल्ले, कृणालसिंग तिलवार, अंकुश दुबे, सुजल यादव, रोहित चवरे, अखंड प्रतापसिंह, कृणाल पवार, करण नावांगे, आदित्य मस्के, पवन सावळे सह नागरिक उपस्थित होते.