नागपूर :- पोलीस ठाणे तहसिल हद्दीत सैफी कॉम्प्लेक्स, जागनाथ बुधवारी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी ऋषी अशोक खन्ना, वय ३४ वर्ष यांचे मधुर केमीकल नावाचे दुकान आहे. त्यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये आरोपी शैलेष ज्ञानेश्वर केदार वय ३८ वर्ग रा. रेशीमबाग, कोतवाली, नागपूर याचे कडून ३०,०००/- रू १० टक्के व्याजाने घेतले होते. व परतफेड म्हणून दर महिन्याला ३,०००/- रू असे १० महिने दिले होते. दरम्यान आरोपी हा गुन्हयामध्ये जेलपास झाल्याने फिर्यादीने पैसे देने बंद केले होते. जेल मधुन सुटल्यावर फिर्यादीने आरोपीस पुर्ण पैसे परत दिले होते. पैसे परत्त दिल्यावरही आरोपी ऑगस्ट २०२३ पासुन फिर्यादीस पुन्हा पैश्याची मागणी करून धमकी देत होता. दिंनाक ३१. ०५.२०२४ चे १५.३० वा. चे सुमारास फिर्यादी सिटी पोस्ट ऑफीस जवळील सुलुनवाले दुकानात कटिंग करण्यास गेले असता आरोपी व त्याचा एक साथिदार यांनी येवुन फिर्यादीस शिवीगाळ करून हातबुक्कीने मारहाण केली. व ३०,०००/- रूः ची मागणी करून न दिल्यास जिवे मारण्याची तसेच दुकान बंद करण्याची धमकी दिली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे तहसिल येथे पोउपनि, साळवे यांनी आरोपीविरूध्द कलम ३२३, ५०४, ३८७, ३४ भा.द.वि. सहकलम ३९ महाराष्ट्र सावकारी अधिनीयम २०१४ अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपी व त्याचा साथिदार आरोपी क. २) इंगा उर्फ खुशाल दत्तात्रय शेंडे वय ३१ वर्ग रा. नवाबपूरा, दुर्गा मंदीर जवळ, कोतवाली यांचा शोध घेवुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.