संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– सायकल यात्रेतून आरोग्यासह पर्यावरणाचा संदेश
कामठी :- मागील तीन वर्षांपूर्वी संपूर्ण भारतात कोरोणाचा प्रादूर्भाव पसरला होता .माणूस माणसाजवळ यायला घाबरत होते..नाते दुरावत होते..माणुसकीचा ऱ्हास होत होता अशा कोरोनाच्या प्रादुर्भावात दिल्लीच्या आनंद सिंह नामक तरुणाचा 2020 मध्ये खाजगी नोकरी गेली व 2021 मध्ये कोरोनामुळे वडील मरण पावले या मानसिक तणावातून बाहेर निघत जगण्यासाठी ऑक्सिजन खूप महत्त्वाचा आहे यासाठी पर्यावरणाचे संरक्षण गरजेचे आहे त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत विविध प्रांतीय विविध भाषिय नागरिकांच्या या भारत देशात असलेला कौमी एकता तसेच माणुसकीच्या शोधात गर्दीत माणसाच्या माणूस शोधते मी या संकल्पनेतून दिल्लीच्या आनंद सिंह नामक 24 वर्षीय तरुणाने 7 ऑक्टोबर 2023 पासून संपूर्ण भारतभर भारतयात्रा करण्यासाठी सायकलवारी करीत आहे.ही सायकल वारी करणारा तरुण आनंद सिंह आज सकाळी 8 वाजता कामठी च्या बस स्टँड चौकात पोहोचताच यांचा येथील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर,माजी नगराध्यक्ष नीरज यादव, ऍड अभय गेडाम, समाजसेवक नफिस शेख, आसाराम हलमारे, राजेश गजभिये, गीतेश सुखदेवें, आशिष मेश्राम, विकास रंगारी,नागसेन सुखदेवें ,कृष्णा पटेल, नसीम अब्बास, सलमान अब्बास, स्लीमभाई आदी उपस्थित होते. जग बदलले आहे. सर्व सुखसोयी पायाजवळ आहेत. गरजाही पूर्ण होत आहे. असे असले तरी खरी संपत्ती आरोग्य आणि पर्यावरण आहे मात्र सुदृढ आरोग्य आणि चांगले पर्यावरण हे आपल्यापासून दूर जात आहे. याचे रक्षण हेच आपल्या सुखी जीवनाचे आणि भविष्याचे गमक असल्याने सायकलचा जास्तीतजास्त उपयोग करून आपण आपले आरोग्य चांगले ठेवू शकतो. झाडे लावून त्यांना जगवून पर्यावरणाचे संरक्षण आणि होणारा ऱ्हास टाळू शकतो. तेव्हा सायकल चालवा त्यातून आपले आरोग्य आणि झाडे लावून पर्यावरण चांगले ठेवा, असा संदेश सायकल चालवण्यातून भारत भ्रमण करणाऱ्या आनंद सिंह यांनी दिला.
हा तरुण 7 ऑक्टोबर 2023 ला सायकल ने भारत यात्रा करण्यासाठी घरून फक्त 500 रुपये घेऊन निघाले.यांनी ही भारत यात्रा दिल्ली ते राजस्थान,गुजरात,मध्यप्रदेश मार्गे भ्रमण करीत 22 जानेवारी 2024 ला अयोध्या येथे पोहोचून प्रभू श्री रामजीच्या प्राणप्रतिष्ठात सहभागी होवून पुन्हा मध्यप्रदेश मार्गे नागपूर होत कामठी शहरात पोहोचले.आजपावेतो 221 दिवसात 10 हजार किलोमीटर सायकलवारी झाली असून आज सायकलने नवी ऊर्जा व प्रेरणा घेऊन सायकलस्वारने पुढे रवाना झाले आहेत..
दररोज सायकल चालवल्याने पेट्रोलवर होणारा अनावश्यक खर्चही टाळता येतो. यातून एक ना अनेक फायदे होत असल्याने सायकल चालवण्याचा संदेश या प्रवासातून देत असल्याची माहिती सायकलस्वार आनंद सिंह यांनी दिली.