नवी दिल्ली :- सामाजिक क्रांतीचे उद्गाते, थोर समाजसेवक, महात्मा बसवेश्वर यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात आज साजरी करण्यात आली.
कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्यासह कार्यालयात उपस्थित सर्व कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.