कामठीतील भीम जयंती सोहळा ठरला अभूतपूर्व 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– माझ्या भीमानं… भीमान माय.. सोन्यानं भरली ओटी-

कामठी :- युगपुरुष,क्रांतिसूर्य,प्रज्ञासूर्य, विश्वरत्न,महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे निघनारी भीम जयंती मिरवणूक यावर्षीसुद्धा मोठ्या जल्लोशात काढण्यात आली होती.कामठी शहरातील प्रत्येक रस्ते हे निळ्या पाखरांनी भरले होते.विविध रस्ते मार्गाने काढण्यात आलेल्या मीरवणुकीमध्ये तरुणाई ढोल ताशांच्या अनं साउंड सिस्टिमच्या तालावर थिरकत होती.माझ्या भीमान …भीमान माय..सोन्यानं भरली ओटी अश्या विविध भीमगीतावर तरुणाई बेभान व बेधुंद अशी नाचत होती.जय भीम जय भीम हा नारा आसमंतात गर्जत होता.सर्वत्र उत्साह व जल्लोषाचे चित्र डोळ्यांचे पारणे फेडत होते.जयंती उत्सव सोहळयातील लहान थोरांचा सहकुटुंब सहभाग हा प्रत्येकाचा आनंद द्विगुणित करत होता.

महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सोहळा हा 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येच्या रात्री 12 वाजेच्या घडाळ्याच्या ठोक्यापासूनच सुरुवात करण्यात आला.विविध वस्त्यातुन जयभीम चा जयघोष करीत निघालेल्या मिरवणुका ह्या जयस्तंभ चौकात पोहोचताच विविध प्रकारच्या विद्दुत रोषणाईने सजवून असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात 133 किलो च्या भव्य केक कापुन भीमजयंतीचा जल्लोष करण्यात आला.यावेळी या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला मिनी संविधान चौकाचे स्वरूप प्राप्त झाले होते तर या मिनी संविधान चौक स्वरूप निर्मितीसाठी माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम,माजी नगरसेविका प्रतिभा मेश्राम, धीरज मेश्राम,आकाश मेश्राम,सुरज मेश्राम, कमलेश मेश्राम, प्रदीप हुमने,यासह इतर सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व भीम उत्साही तरुणांनी मोलाचे सहकार्य केले.14 एप्रिल ला सकाळी 7 वाजेपासूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध राजकीय सामाजिक संघटनेच्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यासाठी हजारोच्या वर संख्येत निळ्या पाखरांची गर्दी जमली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन वाहण्यासाठी विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी,विविध राजकीय,सामाजिक।संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन केले.तर सायंकाळी 7 वाजता प्रबुद्ध नगर येथून सार्वजनिक भीम जयंती मिरवणूकीचा शुभारंभ करण्यात आला.या मिरवणुकीत प्रबुद्ध नगर,नया बाजार, जयभीम चौक, कामगारनगर,बुद्धनगर,रमानगर, भीमनगर, रामगढ,आनंद नगर,कुंभारे कॉलोनी, हरदास नगर,येरखेडा, रणाळा आदी भागातुन काढण्यात आलेल्या मिरवणुका एका पाठोपाठ मार्गभ्रमन करीत जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीचे समापन करण्यात आले तर या मिरवणुकीचे कांग्रेस,शिवसेना,वंचित बहुजन आघाडी, बहुजन रिपब्लिकन एकता मंच,यासह विविध सामाजिक राजकीय संघटनेद्वारे स्वागत करण्यात आले.मिरवणुकीत लहानांपासून ते प्रौढापर्यंतचे आंबेडकरी अनुयायी शुभ्र पांढरे वस्त्र परिधान करून निळे फेटे बांधून जयभीम चा जयघोष करीत डी जे च्या तालावर तरुणाई थिरकताना दिसले तसेच या सर्व मिरवणुका डोळ्याचे पारणे फेडत होते.तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीचाही भीम जयंती सोहळा अभूतपूर्व ठरला.मिरवणुका सुव्यवस्थित पार पडाव्या यासाठी पोलीस विभागातर्फे डीसीपी निकेतन कदम, एसीपी विशाल क्षीरसागर,नवीन कामठीचे पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या नेतृत्वात विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.तर यावर्षी मिरवणूक दरम्यान महामार्गावर तासंनतास अडकलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजित पद्धतीने महामार्गावर बॅरिकेट्स लावून एका मार्गची वाहतूक कायम ठरत बस स्टँड चौकातुन वाहतूक वळविण्यात आल्याने दरवर्षी प्रमाणे खोळबनारी वाहतूक सुरळीत राहली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मागील नऊ वर्षांपासून सातत्याने राबवतात 'एक वही एक पेन'सामाजिक उपक्रम

Sun Apr 14 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट तर्फे ‘एक वही एक पेन’उपक्रमा अंतर्गत परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन   कामठी :- 14 एप्रिल परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी तर्फे संयोजक राजेश गजभिये,प्रमोद खोब्रागडे, काशिनाथ प्रधान, अविनाश उकेश, आनंद गेडाम, विकास रंगारी, आशिष मेश्राम ,गीतेश सुखदेवें यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी येथील लिबर्टी कॉम्पेटीटीव्ह क्लासेस तर्फे जयस्तंभ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com