नागपूर :- नागपूर लोकसभा निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागलेले असून दररोज अनेक संघटना इंडिया घाडातीली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा जाहीर करत आहे. याच मालिकेत आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनीयन, यादव समाज, कंत्राटी कामगार, असंगठित, फुटपाथ विक्रेते, ऑटो व ई-रिक्षा चालक, अधिवेशन कामगारांच्या संगटनांनी आपले समर्थन जाहीर केले आहे.
असंघठीत कामगारांचे संगठनही भापज विरोधात मैदानात
कंत्राटी कामगार, असंगठित, फुटपाथ विक्रेते, ऑटो व ई-रिक्षा चालक, अधिवेशन कामगारांनीही विकास ठाकरेंना समर्थन जाहीर केले आहे. नुकतेच आगामी लोकसभा निवडणूकी संदर्भात भूमिकी ठरविण्यासाठी कामगार सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते आणि मार्गदर्शक मोहनदार नायडू होते. प्रामुख्याने कामगार नेते जम्मू आनंद, अनिल हजारे यांची उपस्थिती होती. संविधानाचे रक्षण करण्यासाठी, महागाई, बेरोजगारी आदी मुद्द्यांवर चर्चेनंतर संघटनेकडून हा समर्थन जाहीर करण्यात आला आहे.
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनीयन
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनीयननेही आपला पाठींबा जाहीर केला आहे. पाठींब्यासदर्भात युनियनचे अध्यक्ष राजेंद्र साठे, महासचिव प्रिती मेश्राम आणि शहर सचिव रंजना पौनिकर यांनी हा पत्र जाहीर केला आहे.
यादव समाजाचेही ठाकरेंना समर्थन
महाराष्ट्र यादव समाजानेही आपले समर्थन विकास ठाकरे यांना जाहीर केले असून येत्या १९ एप्रिल रोजी मतदान करुन मोठ्या मताधिक्याने ठाकरे विजयी होतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र संघटनेचे अध्यक्ष राजीव पटेल, कार्यकारी अध्यक्ष सतीश यादव आणि सचिव शैलेश यादव यांच्या स्वाक्षरीने जारी केला आहे.
संविधानाच्या रक्षणासाठी सर्व एकत्र
संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी आणि नागपूरच्या खऱ्या विकासासाठी आतापर्यंत विकास ठाकरे यांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष (खोरीपा), रिपब्लिकन संयुक्त आघाडी यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरविले आहे.
तेली समाजही ठाकरेंच्या पाठीशी
सत्ताधारी भाजपने तेली समाजाकडे आजपर्यंत फक्त मतदार म्हणूनच बघितले आहे. मात्र त्यांना नेतृत्वाची संधी आजपर्यंत दिली नाही. दुसरीकडे काँग्रेसने आजवर तब्बल २७ पेक्षा जास्त तेली सामाजातील बांधवाना संधी दिली आहे. काँग्रेसकडे मोठ्या संख्येत तेली बांधवांचे समर्थन आहे. त्यामुळेच तेली समाज आज काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे विधान परिषदेचे मुख्य प्रतोद आणि आमदार अभिजित वंजारी यांनी सांगितले. गुरुवारी जवाहर विद्यार्थी गृह येथे तेली समाजाच्या वतीने आयोजित स्नेह मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी तेली समाज हा नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी असून इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांच्याशी तेली समाजाचे राजकारणापलिकडचे संबंध आहे. त्यामुळे यंदा ठाकरे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास यावेळी तेली बांधवांनी व्यक्त केला. स्नेहमिलनात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, विधान परिषदेचे मुख्य प्रतोद आणि आमदार अभिजित वंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव शेखर सावरबांधे, आम आदमी पार्टीचे नागपूर शहराचे अध्यक्ष अजिंक्य कळंबे, पुरुषोत्तम हजारे, संजय महाकाळकर, नितीन कुंभलकर, मंगला गवरे, नयना झाडे, संगीता तलमले उपस्थित होते.