नागपूर :- फिर्यादी पुष्पा मोरेश्वर हुलके वय ४५ वर्ष रा. कुंनवीपूरा मोहल्ला, जुनी फुटाळा, अंबाझारी नागपूर हया मॉर्निंग वॉक करीता फिरत असतांना पोलीस ठाणे अंबाझरी हद्दीत भरत नगर, तिसरी गल्ली, अॅडव्हॉकेट एम. के यांचे घरासमोर त्यांचे मागुन आलेल्या पांढऱ्या रंगाचे दुचाकी वरील २० ते २५ वर्ष वयाचे आरोपी पैकी मागे बसलेला याने फिर्यादीचे गळ्यावर थाप मारून त्यांचे गळयातील सोन्याची पोत मणि असलेली ४ ग्रॅम किंमती ४,०००/- रु ची जबरीने हिसकावुन पळुन गेले. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्ट वरून पोलीस ठाणे अंबाझरी येथे कलम ३९२, ३४ भा.दं.वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. २, चे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून त्यांना मिळालेले खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन आरोपी क. १) श्याम उर्फ अन्ना अनिल नायडु वय १९ वर्ष रा. हजारी पहाड, आशा बालवाडी जवळ, गिट्टीखदान, नागपूर २) पवन उर्फ आलू राजेन्द्र भोसले वय ३१ वर्ष रा. जय नगर, पांढराबोडी, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींना सखोल चौकशी केली असता त्यांनी पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत, दिनांक ०६.०४.२०२४ रोजी सकाळी ०६.३० वा. चे दरम्यान प्लॉट नं. ९२, समोर, लेड्रा पार्क, रामदासपेठ येथुन मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यात टांगलेली काळया रंगाची पर्स, मोबाईल ज्यामध्ये मोवाईल व रोख ३५०/- रू असलेली जबरीने हिसकावुन नेल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातुन गुन्हयात वापरलेल्या दोन मोटरसायकल, सोन्याची मणि, एक ओपो कंपनीचा मोबाईल व रोख ३००/- रू असा एकूण किंमती अंदाजे ३,०३,३००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे अंबाझरी यांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शनात, सपोनि गजानन चांभारे, पोउपनि मनोज राऊत, पोहवा, नरेश तुमडाम शैलेप, नापोअं. प्रविण शेळके, कमलेश गणेर, संदीप चंगोले, गजानन कुबडे, पोअं. सुरेश तेलेवार, आशिष धंदरे, प्रविण चव्हाण यांनी केली.