होर्डिंग, बॅनर, पोस्टर परवानगीशिवाय लावण्यास मनाई

यवतमाळ :- निवडणूक कालावधीत होर्डिंग, बॅनर, पोस्टर ठिकठिकाणी लावल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. त्यामुळे अशा बाबी परवानगी शिवाय लावण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. परवानगीने लावलेल्या या बाबी परवानगी संपल्यानंतर संबंधितांना काढणे बंधणकारक राहणार आहे.

मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यान्वये जिल्हा दंडाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी याबाबत आदेश पारीत केले आहे. निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधित व्यक्ती, संस्था यांच्याकडून होर्डिंग, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर प्रतिबंध घालण्यात आले आहे.

या प्रतिबंध आदेशान्वये लोकसभा निवडणूकीच्या कालावधीमध्ये शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपता करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध राहणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई सीमाशुल्क विभागाने सुमारे 265 कोटी रुपयांचे 31.948 किलो अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ केले नष्ट

Wed Mar 20 , 2024
मुंबई :- महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) अमली पदार्थ नष्ट करणाऱ्या उच्च स्तरीय समितीने 19.03.2024 रोजी 31.948 किलो वजनाचे अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस), अर्थात मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम करणारे पदार्थ जप्त केले. यामध्ये हेरॉईन, कोकेन, मारिजुआना ई. अमली पदार्थांचा समावेश होता. कॉमन हॅझर्डस वेस्ट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com