संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- 10 ऑगस्ट 2022 ते 1 मार्च 2024 दरम्यान आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून विदर्भ कबड्डी असोसिएशन चा लेटर हेड वापरून ,मागिल तारखेत हौशी कबड्डी असोसिएशन नागपूर व वाशीम कबड्डी असोसिएशन संस्थेच्या नावाने स्टॅम्प तयार करून खोटे शिक्का,व मोहोर वापरून बनावटी हस्ताक्षर केल्याच्या आरोपातुन फिर्यादी अशोक रामचंद्र राव मोरे वय 72 वर्षे रा विदर्भ कबड्डी असोसिएशन कार्यालय ,नागसेन क्रीडा मंडळ खलाशी लाईन कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मदन रतन रा नागपूर, जितेंद्र ठाकूर रा अमरावती,प्रदीप सेलूकर रा उमरेड रोड,रामनाथ नवघरे रा कळबा महाली, वासुदेव नेरकर रा अकोला,देवराज चतुर्वेदी रा नागपूर या सहा आरोपी विरुद्ध भादवी कलम 120-बी,201,406,417,467,468, 471, 473,34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.