सावनेर :- फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. सावनेर येथे अप क्र. ८१४/१९ कलम ३७६, ३७६(३) भादवी सहकलम ४, ५ (जे) (२) ५ एल ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
यातील फिर्यादीची अल्पवयीन पिडीत मुलीला आरोपी नामे बळीराम तुळशिराम इरपाची, वय ४५ वर्ष, रा. शेरहीता सावनेर जि. नागपुर याने पिडीतेच्या घरी कोणीही नसताना घरी येवुन वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. पिडीतेला रक्ताची कमी असल्याने मेडीकल कॉलेज नागपुर येथे उपचाराकरीता आणले असता डॉक्टरांनी सोनोग्राफी करून सांगीतले की पिडीता हो ०६ महिण्याची गर्भवती आहे.
सदर प्रकरणाचे तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक सोनाली रासकर मॅडम यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश ओ.पी. जयस्वाल सो, जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर कोर्टामध्ये सादर केले, आज दिनांक २२/०२/२०२४ रोजी अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश ओ.पी. जयस्वाल सो, जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांनी वरील नमुद आरोपीला कलम ४ पोक्सो मध्ये २० वर्ष सश्रम कारावास व २०००/-रू. दंड दंड न भरल्यास ३ महीने सश्रम कारावास तसेच कलम ६ पोक्सो मध्ये २० वर्ष सश्रम कारावास व २०००/-रू. दंड दंड न भरल्यास ३ महीने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी खापर्डे यांनी काम पाहीले, कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन पोहवा मधुकर आदमने पो. स्टे. सावनेर यांनी मदत केली आहे.