यवतमाळ :- मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी देखील अभिवादन केले.