मुंबईकरांचे प्रश्न मार्गी लावल्याबद्दल 20 फेब्रुवारी रोजी ‘धन्यवाद देवेंद्रजी’ कार्यक्रमाचे आयोजन भाजपा आ. प्रवीण दरेकर यांची माहिती

मुंबई :- मुंबईकरांचे गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक प्रश्न मार्गी लावल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, मुंबई जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने 20 फेब्रुवारी रोजी ”धन्यवाद देवेंद्रजी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष व भाजपा आ. प्रवीण दरेकर यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ.दरेकर बोलत होते. आ.प्रसाद लाड, भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, भाजपा प्रदेश प्रवक्ते आसिफ भामला आदी यावेळी उपस्थित होते. 20 फेब्रुवारी रोजी काळाचौकी अभ्युदय नगर येथील भगतसिंग मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.       आ. दरेकर यांनी सांगितले की,लाखो मुंबईकरांचे गृहनिर्माण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी गोरेगाव येथे गृहनिर्माण संस्थांच्या सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत करण्यात आलेल्या अनेक मागण्या मान्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. या परिषदेतील 16 विषयांबाबत राज्य शासनाने शासन निर्णयही जारी केले आहेत. अनेक वर्षांच्या मुंबईकरांच्या मागण्या मान्य करत प्रश्न मार्गी लावल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने होणाऱ्या या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशीष शेलार, मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, माजी आमदार बाळा नांदगावकर, हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार स्वयं पुनर्विकासाची प्रकरणे एक खिडकी योजनेच्या माध्यमातून राबविली जाणार आहेत, तसेच स्वयंपुनर्विकासाकरीत कर्जावर व्याज सवलत ही देण्यात येणार आहेत, अशी माहितीही आ. दरेकर यांनी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शरद पवारांचा निखिल वागळे आणि  पत्रकार मधुकर भावेंचा लोच्या झाला 

Thu Feb 15 , 2024
काल परवा पत्रकार मधुकर भावे यांनी लिहून ठेवलय कि डीलर अशोक चव्हाण आता लीडर झालेत, आणि ते अख्य्या लेखातून नेहमीप्रमाणे भाजपावर घसरले, मधुकर भावे जिकडे तिकडे वाटोळे ठरलेले म्हणूनच आपले वाटोळे होण्याआधी दर्डा बंधूंनी भावेंना त्यांच्या लोकमत दैनिकातून घालवले, बरे झाले, कारण भावे असते तर दर्डांचे पण वाटोळे झाले असते, भावे यांना घालविल्यानंतर हाकलून लावल्यानंतर दर्डा साऱ्याच क्षेत्रात अधिक मोठे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!