नागपूर :- ग्रमीण जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन पारशिवनी येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार जयंत शेरेकर, बक्कल नंबर १२२४ यांचे दिनांक २३/११/२०२२ रोजी कर्तव्यावर हजर असताना अपघाती निधन झाले होते. या अपघातामध्ये मृतक जयंत शेरकर यांच्या परिवाराला सहाय्य करण्याच्या दृष्टीकोणातून नागपूर ग्रामीण पोलीस दल व एचडीएफसी बँकेने सकारात्मक पाऊले उचलली. त्यानुसार दिनांक ०२/०२/२०२४ रोजी एचडीएफसी बँकेकडुन प्राप्त ०१ कोटी रुपये रकमेचा वेतन विमा सहायता निधीचा धनादेश पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार यांच्या हस्ते मृतक जयंत शेरकर यांची पत्नी प्रविणा जयंत शेरकर यांना देण्यात आला आहे. यावेळी पोलीस उप अधीक्षक (गृह) विजय माहुलकर, उप उपाध्यक्ष EBFS, HDFC बँक विदर्भ सर्कल महेश धकाते व ब्रांच मेनेजर एवडीएफसी बँक सदर ब्रांच अमित व्यवहारे, रितेश पॉल यांची उपस्थिती होती. अपघातामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचान्यांच्या कुटुंबियांना वेळीच सहाय्यता मिळावी याकरीता नागपूर ग्रमीणचे पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोहार हे सदैव प्रयत्नरत असल्याबाबत यावेळी त्यांनी आश्वासन दिले आहे.