नागपूर :- भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगर कार्यकारिणी मध्ये अमेय विश्वरूप यांची नियुक्ती नुकतीच भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या कडुन घोषित करण्यात आली.
भाजयुमोचे संघटन बळकट करण्याकरीता ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमेय यांनी या अगोदर अभाविप व भाजयुमो मध्ये अनेक पदांची धुरा यशस्वीपणे पार पाडली आहे. अमेय यांना संघटनेत काम करणाचा प्रदिर्घ अनुभव आहे.
नियुक्ती बद्दल अमेय विश्वरूप यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र (बंन्टी) कुकडे, आमदार प्रविण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, माजी माहापौर व उपमुख्यमंत्री मानद सचिव संदीप जोशी, भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजपा शहर महामंत्री विष्णु चांगदे, रामभाऊ अंबुलकर, संदिप गवई, विलास त्रिवेदी, अश्विनी जिचकार, भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळ अध्यक्ष रितेश गावंडे, भाजयुमो शहर अध्यक्ष बादल राऊत यांचे आभार मानले.