ज्येष्ठ नागरिकांचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढविण्यासाठी कटिबद्ध – केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

*खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ*

*सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी जिंकले सभागृह*

नागपूर :- निवृत्तीनंतर ज्येष्ठांना एकाकीपण येण्याची शक्यता असते. झपाट्याने बदलणाऱ्या काळात त्यांच्या आवडी-निवडी, इच्छा मागे राहून जातात. त्याचाच विचार करून ज्येष्ठांना ज्या गोष्टींनी आनंद मिळेल, त्यांचे मनोरंजन होईल, त्यांचे आरोग्य उत्तम राहील, त्या सर्व गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जगात सध्या हॅपिनेस इंडेक्सची चर्चा आहे. ज्येष्ठांच्या आयुष्याचा ‘हॅपिनेस इंडेक्स’ वाढवून त्यांचे जीवन आनंदी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवात केले.

ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते दत्ता मेघे अध्यक्षस्थानी होते. तर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांची विशेष उपस्थिती होती. माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार ना.गो. गाणार, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. अनिल सोले, सचिव डॉ. राजू मिश्रा, कोषाध्यक्ष अशोक मानकर, विश्वस्त  प्रभाकर येवले, प्रतापसिंह चव्हाण, गोपाल बोहरे, नारायण समर्थ, बाळ कुळकर्णी, अविनाश घुशे, डॉ. संजय उगेमुगे, गौरी चांद्रायण आणि महमूद अंसारी यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. नितीन गडकरी म्हणाले, ‘खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे नियमीत आयोजन केले जाते. पण ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आवडीच्या कलावंतांचे कार्यक्रम बघता यावे, या उद्देशाने खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याची कल्पना पुढे आली. ज्येष्ठांच्या मनात कुठल्याही परिस्थितीत कुटुंबात किंवा समाजात दुर्लक्षितपणाची भावना निर्माण होऊ नये म्हणून सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, तीर्थपर्यटन आदी क्षेत्रातील उपक्रम राबविण्यात येतात. प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला काहीतरी करण्याची इच्छा असते, पण त्यांना संधी मिळत नाही. खासदार क्रीडा महोत्सव, खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव ही संधी उपलब्ध करून देतात.’ श्री. दत्ता मेघे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘नितीनजींसारखे व्यक्तिमत्व आपल्या नागपूरला खासदार म्हणून लाभले हे आपल्या साऱ्यांचे भाग्य आहे. ते प्रत्येक जनरेशनचा विचार करतात आणि सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. नागपूरमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात ते ज्या पद्धतिने काम करीत आहेत, ती आपल्यासाठी नागपूरकर म्हणून अभिमानाची बाब आहे.’ यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले.

*कर्तृत्ववान ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार*

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. बैद्यनाथ ग्रुपचे संचालक श्री. सुरेश शर्मा, अमेरिकेत स्थायिक प्रसिद्ध डॉक्टर सुभाष देशमुख, प्रख्यात सीए कंपनीचे संस्थापक व नागपुरात डेस्टिनेशन वेडिंगची संकल्पना रुजविणारे ब्रीज किशोर अग्रवाल, २५ वर्षांपासून कुठल्याही सरकारी अनुदानाशिवाय संस्कार शाळा चालविणाऱ्या विभावरी कुळकर्णी, सुप्रसिद्ध कवयित्री व साहित्यिक आशा पांडे यांना यावेळी गौरविण्यात आले.

*‘वन्स मोअर’ आणि फर्माईश*

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या भक्तीगीत व भावगीत गायनाने सभागृह जिंकले. प्रत्येक गाण्याला मिळणारा वन्स मोअर आणि सभागृहातून येणारी फर्माईश ऐकून महेश काळे भारावून गेले. श्रोत्यांमध्ये उपस्थित ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांची ‘मन मंदिरा’ या गाण्याची फर्माईश देखील महेश काळे यांनी पूर्ण केली. ‘मोरे घर आ जा रे’, ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’, ‘राम रतन धन पायो’, ‘भेटी लागी जीवा’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ आदी गाणी त्यांनी सादर केली. त्यांना राजू तांबे, पांडुरंग पवार, अपूर्व द्रविड, ओंकार दळवी, हर्षित सरकार, अमृत चनेवार आणि गोपाळ गावंडे यांनी वाद्यसंगत केली. ओंकार गावंडे हे नागपूरचे असून त्यांना ‘सूर नवा ध्यास नवा’ या शोच्या माध्यमातून शिष्यवृत्ती मिळाल्याचा महेश काळे यांनी गौरवाने उल्लेख केला.

सभागृह हाऊसफुल्ल *

खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवासाठी कवीवर्य सुरेश भट सभागृह हाऊसफुल्ल झाले होते. अनेक प्रेक्षकांनी सभागृहाच्या बाहेर लागलेल्या स्क्रीनवर कार्यक्रमाचा आनंद लुटला.

* महोत्सवात आज *

कोकण कन्या बँड कॉन्सर्ट

स्थळ : कवीवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग

वेळ : सायं. ५.३० वाजता

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री ने श्री राम जन्मभूमि मंदिर को समर्पित छह स्मारक डाक टिकट जारी किए

Sat Jan 20 , 2024
– “इन टिकटों पर कलात्मक अभिव्यक्ति के माध्यम से प्रभु राम के प्रति भक्ति व्यक्त की गई है” – “प्रभु राम, माँ सीता और रामायण से संबंधित शिक्षाएँ समय, समाज और जाति की सीमाओं से परे हैं और प्रत्येक व्यक्ति से जुड़ी हुई हैं” – “ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, अमेरिका, न्यूजीलैंड समेत दुनिया के कई देशों ने प्रभु राम के जीवन प्रसंगों […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!