कुस्तीमध्ये रेणू पवार, आर्यन सरदार विजेते : खासदार क्रीडा महोत्सव

नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवातील कुस्ती स्पर्धेमध्ये मुलींच्या 49 किलो वजनगटात यवतमाळची रेणू पवार आणि मुलींच्या 50 किलो वजनगटात अकोल्याचा आर्यन सरदार यांनी विजय मिळविला.

झिंगाबाई टाकळी येथील श्रीराम मंदिर, राठी लेआउट, झेंडा चौक येथे सुरू असलेल्या स्पर्धेत गुरूवारी (ता.18) मुलींच्या 49 किलो वजनगटात नागपूर ग्रामिणची कुस्तीपटू कनक भागदेला दुस-या तर नागपूर ग्रामिणची आरती वाडीवे हिला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. मुलांच्या 50 किलो वजन गटात वाशिम येथील गणेश डुबे दुसरा आणि भंडारा येथील रजत अनिल झंझाड तिस-या स्थानी राहिला.

अन्य सामन्यांमध्ये मुलींच्या 33 किलो वजन गटात नागपूर ग्रामीणची राणी रामदास निकुळे पहिली, यवतमाळची पोर्णिमा धम्मपाल शेजुळे दुसरी आणि चंद्रपूरची कृतिका सुपेका उपरकार तिसरी ठरली. 36 किलो वजन गटात भंडा-याची ऐश्वर्या शिंगाडे, 40 किलो वजनगटात नागपूर ग्रामिणची अश्विनी बावणे, 43 किलो वजनगटात भंडा-याची प्रणाली झंझाड, 46 किलो वजनगटात नागपूरची प्रांजल खोब्रागडे या कुस्तीपटूंनी पहिले स्थान प्राप्त केले.

मुलांच्या 35 किलो वजनगटात नागपूरचा कुणाल माहुले, 40 किलो वजनगटात भंडा-याचा सुमित झंझाड आणि 45 किलो वजनगटात चंद्रपूरचा भावेश बनसोड या कुस्तीपटूंनी पहिले स्थान पटकाविले.

निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)

कुमार मुली –

33 किलो वजनगट –

1. राणी रामदास निकुळे – नागपूर ग्रामीण

2. पोर्णिमा धम्मपाल शेजुळे- यवतमाळ

3. कृतिका सुपेका उपरकार – चंद्रपूर

36 किलो वजनगट –

1. ऐश्वर्या राजू शिंगाडे – भंडारा

2. मेघा मारोती मोरे- यवतमाळ

3. ज्ञानेश्वरी रामेश्वर गायकवाड – अकोला

40 किलो वजनगट –

1. अश्विनी नरेश बावणे – नागपूर ग्रामीण

2. अक्षरा रमेश लिल्हारे – नागपूर ग्रामीण

3. अंजली गणेश भालेराव- चंद्रपूर

43 किलो वजनगट –

1. प्रणाली प्रमोद झंझाड – भंडारा

2. आरुषी चंद्रभान बनकर – नागपूर ग्रामीण

3. रिद्धीमा संजय गोधनकर – नागपुर शहर

46 किलो वजनगट –

1. प्रांजल पवन खोब्रागडे – नागपूर

2. साईश्वरी संतोष पवार – यवतमाळ

3. अक्षरा प्रमोद वाडीवे – नागपूर ग्रा.

49 किलो वजनगट –

1. रेणू श्यामराव पवार – यवतमाळ

2. कनक योगेश्वर भायदे – नागपूर ग्रा.

3. आरती प्रमोद वाडीवे – नागपूर ग्रा.

कुमार मुले

35 किलो वजनगट –

1. कुणाल राजहंस माहुले – नागपूर

2. नितीन संतोष पवार – यवतमाळ

3. बंटी संतोष चव्हाण – अमरावती

40 किलो वजनगट –

1. सुमित अनिल झंझाड – भंडारा

2. निर्भय प्रवीण मुन – चंद्रपूर

3. सय्यद अबुबकर सय्यद शफी – वाशिम

45 किलो वजनगट –

1. भावेश राजेश बनसोड – चंद्रपूर

2. यश जयदिप पांडे – अकोला

3. सौरभ नरेश कांबळे – भंडारा

50 किलो वजनगट –

1. आर्यन प्रकाश सरदार – अकोला

2. गणेश रामदास डुबे – वाशिम

3. रजत अनिल झंझाड – भंडारा

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या हस्ते साहित्य, कला, संस्कृती, समाज कार्य क्षेत्रातील वाग्धारा सन्मान प्रदान

Fri Jan 19 , 2024
– नवी पिढी हिंदी, मराठी लिहू – वाचू शकत नाही ही चिंतेची बाब’: राज्यपाल रमेश बैस मुंबई :- भाषा व साहित्य विभिन्न संस्कृती व दृष्टिकोन समजण्यास मदत करतात, तसेच विचारशीलता, ज्ञान व स्नेहभाव वृद्धिंगत करतात. मात्र आज वाचन संस्कृती लोप पावत आहे. दिवसेंदिवस नवी पिढी मराठी, हिंदी व इतर प्रादेशिक भाषा लिहिण्यास व वाचण्यास असमर्थ होत आहे ही चिंतेची बाब […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!