कालिदासाच्या भूमीत होणार महासंस्कृती महोत्सव, दिग्गज कलाकारांच्या सहभागासह अनेक स्पर्धांचे आयोजन

नागपूर :-  शासनाच्या महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात कालिदासाच्या भूमीतून रामटेक येथून 19 जानेवारीला होणार आहे. 23 जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. दिग्गज कलाकारांच्या सहभागासह अनेक प्रकारच्या स्पर्धा या कालावधीत होणार आहेत. सायंकाळी मुख्य कार्यक्रम 7 वाजता सुरु होईल. तर दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

कवि कालिदासांवरील प्रबोधन चर्चासत्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे महा खिचडीचे प्रात्यक्षिक,लेझर शो, फायर शो, नौका स्पर्धा ,फोटोग्राफी व पेंटिंग स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा , एयरोमॉडलिंग शो, फुड फेस्टिवल आणि दिग्गज कलाकारांचे सादरीकरण अशी खास पर्वणी नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे.

राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्थानिक कलाकारांसह अनेक दिग्गज कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यात हेमा मालिनी, कैलास खेर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. 19 जानेवारीला पद्मश्री हेमा मालिनी यांची रामायण नृत्य नाटिका, 20जानेवारीला सुरांचे बादशाह पद्मश्री सुरेश वाडेकर यांचे गीतगायन, 21 जानेवारीला विख्यात गायक, हंसराज रघुवंशी यांचा भक्तीगीत कार्यक्रम, 22 जानेवारीला रामटेकवरील सिंधुरागीरी महानाट्य, 23 जानेवारीला विख्यात गायक पद्मश्री कैलाश खेर यांची स्वरसंध्या असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहून विविध स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

UBT slams Centre for Rs 1 lakh crore lapse and return of farmers’ funds - Kishore Tiwari blasts on negligence of Modi Government !

Tue Jan 16 , 2024
Nagpur :- The Opposition Shiv Sena (UBT) has slammed the Centre for the lapse and return of over Rs 1 lakh crore of funds intended for farmers’ welfare in the last five years, here on Monday. SS-UBT National Spokesperson Kishore Tiwari and farm activist said that while farmers’ suicides are on the rise and the government has hiked the budgetary […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!