संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- केंद्र शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवन्याकारिता विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेचे शासनातर्फे आयोजन करण्यात आलेले आहे.ही यात्रा दिनांक १६ जानेवारीला मंगळवार दुपारी ३ वाजता बिडगाव चौक, नगरपंचायत कार्यालयाजवळ, नगर पंचायत बिडगाव तरोड़ी (खुर्द ) पांढुर्णा येथे आयोजित करण्यात आले आहे . सदर मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजना ,प्रधानमंत्री आवास योजना,आयुष्यमान भारत योजना,प्रधानमंत्री उज्वला योजना,बैंकमार्फ़त विविध कर्ज योजना,आधार अपडेट,आरोग्य शिबीर,इ विविध योजनाची माहिती व लाभ नागरिकांना देण्यात येणार आहे.
तरी नागरिकांना सदर संकल्प यात्रेत सहभागी होवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.असे आवाहन बिडगाव नगर पंचायत चे प्रशासक संदीप बोरकर यांनी नागरिकांना केले आहे.