नागपूर :- नागपूर महानगरपालिकांतर्फे वीर बाल दिवसाच्या निमित्ताने मंगळवारी (२६) रोजी सकाळी गुरु गोविंद सिंह यांचे वीर पुत्र साहिबजादे जोरावर सिंह, साहिबजादे फतेह सिंह, साहेबजादे अजित सिंह, साहेबजादे जुझार सिंह यांचे वीरता,साहसतेचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ सुनील लहाने, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेश बगळे, विधी अधिकारी प्रकाश बरडे, स्थापत्य अधिकारी पंकज पराशर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, राजेश गजभिये, प्रमोद वानखेडे, किशोर चौरे, अविनाश जाधव, अमोल तपासे आदी उपस्थित होते.