नागपूर :- देशाचे माजी कृषी मंत्री, शिक्षण महर्षि डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.
येथील सभागृहात आयोजित या कार्यक्रमात विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसिलदार महेश सावंत यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार ताराचंद कावडकर आणि संध्या खोंडे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.