नागपूर :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासाकरीता व सक्षमीकरण साध्य करण्याकरीता गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी महाविद्यालय व एडुसन फाउंडेशन नागपूर, यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. याद्वारे ग्रामीण भागातील मुलांसाठी कौशल्य पूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्याकरिता व संबंधित प्रकल्पाच्या विकासाकरिता महविद्यालयातील प्रशिक्षित मुलांना इंटर्नशिप व रोजगाराच्या संधी देण्यात येईल. यावेळी एडुसन फाउंडेशनचे संचालक निलेश काळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सलीम चव्हाण यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. प्रवीण वाट व इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रा. आष्टीकर उपस्थित होते.