संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी-मौदा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा-सुरेश भोयर
कामठी :- मागील आठवड्यापासून कामठी तालुक्यात अवकाळी पावसाचे ढग ओढावले आहेत.28 व 29 नोव्हेंबर ला अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली ज्यामुळे कापणी व मळणीसाठी ठेवलेले धान पाण्यात सापडल्याने पिकांचे चांगलेच अतोनात नुकसान झाले तर .29 नोव्हेंबर च्या एक दिवसाच्या पावसानंतर ढग ओसारण्याची वातावरण निर्मिती झाली मात्र शेतकऱ्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळाला होता मात्र जेमतेम एक आठवडा लोटला नाही की काल सहा डिसेंबर ला दिवसभर झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले यामुळे तालुक्यातील बळीराजा चांगलाच हतबल झाला आहे.या आस्मानी संकटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे धान,कापूस,तूर ,मिरची व अन्य पिकांचे संपूर्णतः नुकसान झाले.यापूर्वी सोयाबीन पिकाचे संपूर्णतः नुकसान झाले होते .शासनाने मदत घोषित केली मात्र आज तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचली नाही .सद्या स्थितीत धान पिकांचे पूर्णता नुकसान झाले असून कापूस,तूर,मिरची व अन्य पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे.तेव्हा ई-पीक नोंदणी झालेले व ई पीक नोंदणी न झालेले सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, धान पिकासोबत कापूस, तूर,मिरची, वांगे,टमाटर व अन्य पिकांना नुकसान भरपाई मध्ये समाविष्ट करण्यात यावे,तसेच यापूर्वी शासनाने घोषित केलेले सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व कामठी-मौदा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या न्यायिक हक्कासाठी आज कांग्रेस पक्षातर्फे कांग्रेस नेता, शेतकऱ्यांचे हितकारी माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांच्या नेतृत्वात शेतकरी बांधव व कांग्रेस कार्यकर्त्यांसह आज सकाळी 11 वाजता कामठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सदर मागण्यांची 15 दिवसात पूर्तता न केल्यास कांग्रेस पक्षातर्फे संपूर्ण जिल्ह्यात मोठे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा कामठी चे तहसीलदार ला दिलेल्या निवेदनातून देण्यात आला.
रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून धान कापणी व मळणीचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे मात्र मजुरांचा अभाव व मळणी यंत्राच्या व्यस्ततेमुळे अनेक शेतकऱ्यांचे कापणी व मळणीचे काम लांबणीवर गेले. त्यातच 29 नोव्हेंबर ला झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणी पाणी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कापलेल्या धानाचे कळपे बांध्याच्या पाण्यात सापडले तर अनेकांचे पुंजनेही खुले पडल्याने पाण्यात सापडलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले त्यातच 30 नोव्हेंबर पासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला मात्र आठवडा लोटला नाही की काल 6 डिसेंबर ला पुन्हा तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसला यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पुन्हा पाणी फेरले आहे.तर ई पीक नोंदणी न झालेले शेतकरी ,विमा न काढणारे शेतकरी त्याचप्रमाणे के वाय सी न करणारे शेतकरी अज्ञानामुळे व तांत्रिक अडचणीमुळे लाभापासून वंचित राहणार आहेत त्याचप्रमाणे धान कापणी नंतर पावसामुळे धान पीक पूर्णपणे सडून त्यांना कोंबे फुटलेली आहेत व सडलेले आहेत अश्या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळने अत्यंत गरजेचे आहे मात्र शासन स्तरावर वेगवेगळ्या अटी शर्ती लादून शेतकऱ्याना लाभापासून वंचित ठेवण्याचे शासनाचे धोरण दिसून येत आहे.करिता तहसील प्रशासनाने धान कापूस मिरची तूर व अन्य पिकाचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी व कामठी-मौदा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेढण्यात आले व मागण्यांची 15 दिवसात पूर्तता न केल्यास प्रधासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा सुदधा देण्यात आला.
याप्रसंगी निवेदन देताना माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले,कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे, कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे,उपसभापती कुणाल इटकेलवार,कामठी तालुका ग्रा कांग्रेस अध्यक्ष अनंता वाघ, पंचायत समिती उपसभापती दिलीप वंजारी, येरखेडा ग्रा प सरपंच सारिता रंगारी, पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी, प्रशांत काळे, सोनू कुथे,पळसाड ग्रा प उपसरपंच सुरेश डोंगरे, युवक कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश महासचिव इर्शाद शेख,कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान,आशिष मेश्राम,प्रमोद खोब्रागडे,रामभाऊ खडसन,वामन साबळे,मनोज मेश्राम,गणपतराव वानखेडे, माजी सरपंच किशोर धांडे,माजी सरपंच प्रविण कुतथे, तुषार चौधरी, राजा बनसिंगे,अजाबराव उईके,हेमराज गोरले, विनोद गावंडे,विनोद शहाणे,रवींद्र पाटील, सोपान गावंडे,सचिन चंदनखेडे,गोपाल ठाकरे,मंगेश जगताप, प्रकाश गजभिये,ज्ञानेश्वर ,पांडुरंग जगताप,ज्ञानेश्वर इंगोले,रुपेश शेंदरे, आकाश बाराहाते,देवेंद्र ऐंडे, विनोद धांडे,जनार्दन सांबारे, आकाश इंगोले,विजय भगत,प्रहलाद धावडे,शंकर रोठे,श्रावण डोंगरे,ज्ञानेश्वर जगताप तसेच वारेगाव ग्रा प चे माजी सरपंच कमलाकर बांगरे, राजेश मेश्राम यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते.