ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या स्थापना दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस फेस्टिवलच्या माध्यमातून स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध होणार – माजी राज्यमंत्री ऍड सुलेखाताई कुंभारे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कार्तिक पौर्णिमेच्या पावन पर्वावर 27 नोव्हेंबर सोमवार ला वैभवसंपन्न,शांतीशिल्प, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा 24 वा वर्धापन दिन असून या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय द्वारा सोमवार दिनांक 27 व 28 नोव्हेंबर ला दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल मध्ये विविध धार्मिक,सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश राहणार आहे.तसेच या कार्यक्रमा अंतर्गत कामठी येथील विद्यालय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच हरदास हायस्कुल, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल सह स्थानिक कलावंतांना विविध प्रबोधनपर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्याकरिता ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल चा व्यासपीठ उपलब्ध होणार असून उत्कृष्ट कलावंतांना विविध पारितोषिके देऊन सम्मानीत करण्यात येणार असल्याची माहिती ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख ,ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.

कार्तिक पोर्णिमेच्या पावन पर्वावर विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या वर्धापन दिनानिमित्त 27 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता जपान येथील आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेलोशिप असोसिएशन व निचिरेन शु सोनेनजी विहाराचे प्रमुख वंदनीय पूज्य भदंत वल निचियु (कानसेन)मोचिदा यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना संपन्न होणार आहे.या विशेष बुद्ध वंदनेला जपान येथील जवळपास 30 बुद्ध विहाराचे प्रमुख भिक्खू संघाचा सुद्धा सहभाग राहणार आहे.दुपारी 12 वाजता उपस्थित पुज्यनिय भिक्खू संघाला भोजनदान वितरित केल्यानंतर दुपारी दीड वाजता मुख्य समारंभाला सुरुवात होणार आहे. या मुख्य समारंभा अंतर्गत दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल चे उदघाटन तसेच अप्रतिम असे ‘फूड कोर्ट’चे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते होणार आहे.या प्रसंगी भारत सरकारचे रस्ते व वाहतूक व सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र राज्याचे वने ,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.ड्रॅगन पॅलेस परिसरात 15 हजार स्केअर फूट असलेल्या भव्य दिव्य उभारण्यात आलेल्या फूड कोर्ट चे अप्रतिम आर्किटेक्चर डिझाईन सुप्रसिद्ध आर्किटिस्ट हबीब खान यांनी केले तर स्ट्रक्चरल डिझाईन दिलीप मसे यांनी केले.या फूड कोर्ट च्या बांधकामाकरिता 15 हुन अधिक एजेंसीने आपले योगदान दिले आहे.सामाजिक न्याय विभागाच्या अर्थ सहाय्यातून निर्मिती करण्यात आलेल्या अप्रतिम या ‘फूड कोर्ट’च्या माध्यमातून विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देणाऱ्या लाखो अनुयायांना विविध व्यंजनाचा आस्वाद घेता येईल.

ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल अंतर्गत 27 नोव्हेंबर ला दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत कामठी येथील विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच हरदास स्कुल व हरदास इंटरनॅशनल स्कुल सह स्थानिक कलावंतांना विविध प्रबोधनपर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असून यासाठी कामठी शहरातील 25 च्या जवळपास विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह स्थानिक कलावंतांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट कलावंतांना विविध पारितोषिके देऊन सम्माणीत करण्यात येणार आहे. तर सायंकाळी 7 वाजता मुंबई येथील इंडियन आयडीयल फेम राहुल सक्सेना तसेच सारेगामा फेम राहुल भोसले यांचे ‘बुद्ध ही बुद्ध’या गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच मंगळवार 28 नोव्हेंबर ला सायंकाळी 5 ते 7 दरम्यान मुंबई बँड व म्युजिक मेडिटेशन चे सादरीकरण संतोष सावंत व संघ करणार आहेत. सायंकाळी 7 वाजता प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी व प्रसन्नजीत कोसंबी यांचे प्रबोधनपर बुद्ध व भीम गीतांच्या कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.

तसेच ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल च्या निमित्ताने दिनांक 27 व 28 नोव्हेंबर रोजी प्रदर्शनीचे आयोजन ड्रॅगन पॅलेस परिसरात करण्यात आले आहे.ही प्रदर्शनी सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत लोकांकरीता उपलब्ध राहील .लघु,सूक्ष्म ,व मध्यम विभाग ,खादी ग्राम उद्योग ,हातमाग विभाग ,वस्त्रोद्योग ,महिला बचत गट ,स्वयसेवी संस्था व इतर संस्थांचा या प्रदर्शनीमध्ये सहभाग राहणार आहे.या दोन दिवसीय ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल यशस्वी करण्याकरिता ड्रॅगन पॅलेस ओगावा सोसायटी ,हरदास विद्यालय ,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र,दादासाहेब कुंभारे बहुउद्देशिय प्रशिक्षण केंद्र व इतर सामाजिक संस्थेतील पदाधिकारी ,

शिक्षकवृंद,धम्मसेवक व धम्मसेविका हे अथक परिश्रम घेत आहेत. ड्रॅगन पॅलेस फेस्टिवल च्या या दोन दिवसीय विविध धार्मिक ,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवाणीचा जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा व माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कन्हान - 1300 मिमी फीडर लाइनच्या दुरुस्तीसाठी आपत्कालीन शटडाऊन लकडगंज, सतरंजीपुरा आणि नेहरू नगर झोन प्रभावित...

Sat Nov 25 , 2023
#बाधित भागात टँकरचा पुरवठा नाही… नागपूर :- 25 नोव्हेंबर 2023, लकडगंज, सतरंजीपुरा आणि नेहरू नगर झोनमध्ये कन्हान 1300*900 फीडरवरील जगनाडे चौक आणि प्रजापती चौक येथे लिकेज आढळल्याने आपत्कालीन बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत उल्लेख केलेल्या झोनमधील पाणीपुरवठा थांबवला जाईल. या कालावधीत, खालील भागात पाणी पुरवठ्यात व्यत्यय येईलः लकडगंज झोन – भरतवाडी ईएसआर: देशपांडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com