– नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील २ तर मेंढला येथील १ यांना मिळाला लाभ
नरखेड :- नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील भारतीय स्टेट बैंक मध्ये प्रत्येक खाताधारक साठी विमा योजना राबविल्या जातात जेणे करून काही घटना घडल्यास त्या कुटुंबातील प्रमुखाला त्यांचा लाभ होतो असाच प्रकार जलालखेडा येथील रुपेश धनराज सावरकर यांचा काही दिवसां पुव्री शेतात करंट लागुन मृत्यु झाला तर राजेंद्र मधुकर खंडारे यांचा आजारीपणामुळे मृत्यु झाला व मेंढला येथील प्रविण रमेशराव चरपे याचा सुध्दा आजारीपणामुळे मृत्यु झाला वरील तिनही खाते धारकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना खाते काढते वेळीस काढुन घेतल्या होत्या त्यांचा फायदा सुध्दा त्यांना झाला वार्षिक ४३६ रुपयामध्ये निघणारा हा विमा योजना अंतर्गत त्यांना २ लाख रुपए मंजूर होऊन त्यांच्या वारसानाच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे तसेच भारतीय स्टेट बैंक ऑफ जलालखेडा येथील शाखा व्यवस्थापक परमेश्वर बारई व मेंढला येथील ग्राहक सेवा केंद्र चे प्रमुख विजय चरपे यांनी संपुण गावातील नागरिकाना आवाहन केले आहे कि भारतीय स्टेट बैंक ऑफ जलालखेडा अंतर्गत येत असलेल्या प्रत्येक बिमा योजनेचा लाभ घ्यावा असे प्रत्येक खातेधारकांना आवाहन केले आहे.
मेंढला येथील प्रविण रमेशराव चरपे यांच्या आई च्या खात्यामध्ये २ लाख जमा झाल्यावर भारतीय स्टेट बैंक ऑफ जलालखेडा येथे बोलावून त्याचे सांत्वन करण्यात आले त्यावेळी शाखा व्यवस्थापक परमेश्वर बारई ग्राहक सेवा केन्द्राचे मेंढला येथील विजय चरपे व बैंक मधील इतर कमचारी उपस्थित होते.