मुंबई, दि. 15 :- संत सेवालाल महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
समाजात बुद्धीप्रामाण्य, विज्ञानवाद रूजावा यासाठी संत सेवालाल महाराज यांनी शिक्षणाचा आग्रह धरला. त्यांनी समाज परिवर्तनासाठी आयुष्य वेचले, असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.