संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– महामार्ग पोलिसांनी वाचविले दोघांचे प्राण
– एक गंभीर, तीन किरकोळ जख्मी, कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवारात नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर साईबाबा आश्रम शाळे जवळ नादुरूस्त ट्रक ला चारचाकी वाहनायी मागुन जोरदार धडक लागल्याने झालेल्या अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यु, एक गंभीर व तीन किर कोळ जख्मी झाल्याने कन्हान पोलीसांनी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.२५) ऑक्टोंबर ला अक्षय सरसमलाल सडमाल वय ३० वर्ष रा. बौद्ध नगर इंदौरा चौक नागपुर हे जबलपुर येथुन ट्रक क्र.एम एच ४० ए के ५१७७ मध्ये लेबर च्या मदतीने पार्टी चे बकरा, बकरी भरुन हैदराबाद ला घेऊन जाण्याकरिता सायंकाळी ५ वाजता दरम्यान निघाले असता वाहनात कंडक्टर आणि दोन लेबर वाहन खाली व भरण्याकरिता सोबत होते. गुरुवार (दि.२६) ऑक्टोंबर दुपारी १ वाजता दरम्यान मनसर येथे पोहचले आणि ट्रक च्या बकरा, बकरी ला खाली उतरुन चारा पाणी दिले. सायं काळी ५ वाजता बकरा बकरी वाहनात भरुन राष्ट्रीय महामार्गा ने हैद्राबाद कडे जाण्याकरिता निघाले असता टेकाडी बायपास रोड साईबाबा आश्रम शाळेजवळ सायंकाळी ६.३० वाजता ट्रक चे मागिल दोन्ही चाक फुटल्याने ट्रक चालकाने वाहन रस्त्याचा कडेला उभी करुन ऑफिस च्या बाबु ला ट्रक चे दोन्ही टायर फुट ल्याची माहिती फोन करुन दिली. काही वेळाने ऑफिस चा बाबु इसुजु चारचाकी वाहन क्र. एम एच ४० सी एम ८८७७ मध्ये दोन टायर घेऊन आले. तेव्हा लेबर यांचा मदतीने ट्रक चे दोन्ही टायर खाली उतरुन जैक चा खाली टायर फीट करत असतांना ट्रक मालक अमृत पाल यांचा दुसऱ्या ट्रक क्र. एम एच ४० ए के ४१७७ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन नादुरुस्त ट्रक च्या मागे उभी असलेली चारचाकी वाहनाला मागुन जोरदार धकड दिल्याने वाहन नादुरुस्त ट्रक च्या खाली जाऊन फसली. या अपघातात ट्रक क्र. एम एच ४० ए के ५१७७ मध्ये बसुन असलेला मृतक खुपचंद धरमदा स बन्सल वय ४५ वर्ष रा. ग्राम पोतराई तह. पथरीया जि. दमो मध्यप्रदेश हा खाली पडुन मरण पावला. इसुजू चारचाकी वाहन क्र. एम एच ४० सी एम ८८७७ चा चालक चंचल शंकरलाल अग्निहोत्री वय ५५ वर्ष रा. बाबा बुधाजी नगर नागपुर हा गंभीर जख्मी आणि इतर तीन किरकोळ जखमी झाल्याने कन्हान आणि महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन जख्मींना ताब्यात घेऊन खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता भर्ती केले आहे.
सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी अक्षय सडमाल यांचे तक्रारीवरून आरोपी ट्रक क्र. एम एच ४० एके ४१७७ चा चालका विरुद्ध कलम २७९, ३३७ , ३३८ , ३०४(अ) भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात सहायक फौजदार सदाशिव काटे, महेंद्र जळीतकर हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.
– महामार्ग पोलिसांनी वाचविले दोघांचे प्राण
गुरूवार (दि.२६) रात्री ७ वा चे दरम्यान एन एच ४४ जबलपुर ते नागपूर रोड टेकाडी शिवार आम्ही स्टाफ सह पेट्रोलींग दरम्यान साईबाबा आश्रम स्कुल जवळ ट्रक क्र. एमएच ४० एके ५१७७ याचे टायर पंचर झाल्याने ट्रक रस्त्याच्या बाजुला उभा होता. ट्रक ला टायर देण्याकरिता इसुजू वाहन क्र.एम एच ४० सीएम ८८७७ हा ट्रक च्या मागे उभे असताना त्याच वेळी एचएनआर रोडवेज चा ट्रक क्र. एमएच ४० एके ५१७७ हा भरधाव वेगाने येत असता ब्रेक न लागल्याने ट्रक व इसुजू वाहनाला धडक दिली. त्यामुळे ट्रक क्र. एमएच ४० एके ५१७७ ट्रक वर बसुन असलेला मृतक खुपचंद धरमदास बन्सल वय ४५ वर्ष रा. ग्राम पोतराई तह. पथरिया जि. दमो मध्यप्रदेश हा खाली पडुन मरण पावला. इसुजू क्र. एमएच ४० एके ५१७७ चा चालक चंचल शंकरलाल अग्निहोत्री वय ५५ वर्ष रा. बाबा बुधाजी नगर नागपपर हा गंभीर जखमी असुन इतर तीन किरकोळ जखमी असुन त्यांना लगेच त्वरित कार्यवाई करून पुढील उपचार कामी रूग्णवाहिकेने दवाखान्यात पाठवण्यात आले आणि एनएचआय च्या मदतीने ट्रक ला बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली.