नागपूर :- 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या दरम्यान, दुर्गा पुजा उत्सव पेन्शन नगर झेंडा चौक येथे साजरा करण्यात आला. या उत्सवात लहान मुलांनी खूप आनंद घेतला व मुलांचा आनंद वाढवावा व आनंदमय वातावरण रहावे. याकरिता पेन्शननगर झेंडा चौकात नागरिकांनी दुर्गा पुजा उत्सवात सहभाग घेतला. नवयुवक पुरुषांनी सुद्धा यामध्ये सहकार्य केले. दि.18 ऑक्टोबर रोजी, प्रज्वल मिश्रा यांचे देवीचे भक्ती गीत जागरण करण्यात आले. तसेच 23 सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मित्रमंडळ तसेच पंकज तिवारी यांच्या अध्यक्षतेतत कार्यक्रम पार पडला. यावेळी सिताराम फिसके, बबन यादव, संतोष उपाध्ये, मोन्टू तिवारी, मनोज काळे, अरुण मदने, दिनेश मिश्रा आणि सर्व युवकांनी यामध्ये भाग घेतला. सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेत. असे आवाहन सुरेंद्र बिडवार्ईक यांनी केले. याप्रसंगी सर्व भक्तांनी जागरणाचा लाभ घेतला सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बिडवाईक यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली.
पेन्शन नगर झेंडा चौक येथे पूजा उत्सव साजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com