पंडित दीनदयाल प्रतिष्ठान, मध्य नागपूर तर्फे शिवभोजन थाळी संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन..

नागपूर :-पंडित दीनदयाल प्रतिष्ठान, मध्य नागपूर तर्फे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपुर येथील देवगिरी या निवासस्थानी विनंतीपुर्वक निवेदन देण्यात आले. निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार शिव भोजन थाळी ही गरिबांकरिता राबविण्यात येते. योजना महाराष्ट्र शासनाची आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या योजनेवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा फोटो असणे अवश्यक आहे, परंतु महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन बराच कालावधी झाला असूनही बऱ्याच ठीकाणच्या शिवभोजन थालीच्या बोर्डावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी पालकमंत्री नितीन राऊत यांचेच फोटो आहेत. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्यात आली. पालकमंत्री या नात्याने आपण अधिकाऱ्यांना संबधित ठिकाणचे बोर्ड बदलायला लावून प्रोटोकॅाल अनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच फोटो अद्यायावत करण्याचा आदेश काढावा ही विनंती करण्यात आली.

निवेदनाच्या वेळी प्रामुख्याने सुबोध आचार्य, श्याम चांदेकर, हेमंत बर्डे, राहुल खंगार, दीपांशू लिंगायत, सचिन सावरकर, अथर्व त्रिवेदी, केदार नसणे, रुपेश हेडाऊ, समीर मंडले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीक्षाभूमीवर यंदा बौद्ध विचारांच्या नेत्यांनाच आमंत्रित करा ? - भैय्याजी खैरकर

Wed Oct 18 , 2023
नागपूर :- दि. १७ ऑक्टो – बौद्ध पुनर्वसन व संरक्षण समिती महाराष्ट्र यांच्या वतीने भैयाजी खैरकर यांनी पत्रपरिषद संबोधित करते वेळी, दीक्षाभूमीवर यंदा बौद्ध विचारांच्या नेत्यांनाच आमंत्रित करा असं वक्तव्य परिषदेत केले. स्मारक समितीने जर बुद्ध आंबेडकर विचारधारेच्या विरोधातील लोकांना बोलावले तर त्यांच्याकडून त्रिशरण पंचशील सोबतच 22 प्रतिज्ञाचे पठण करून घ्यावे असे मत यावेळी उत्तम शेवडे यांनी व्यक्त केले. धम्मदीक्षेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!