संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर रेल्वे क्रॉसिंग जवळील एक किलोमीटर दूर अंतरावरील रेल्वे रुळावर एका अज्ञात रेल्वेगाडीच्या धडकेने दोन तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना गतरात्री 9 ऑक्टोबर ला रात्री साडे आठ दरम्यान उघडकीस आली असता या अनोळखी मृतकाची ओळख पटविणे पोलिसांना एक आव्हानच होते मात्र शोधकामात व्यस्त असलेले पोलीस कर्मचारी संजय पिल्ले व देवानंद थोरात यांना विचारपूस दरम्यान सदर अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात यशप्राप्त झाले. ही ओळख अवघ्या काही तासानंतरच पटविण्यात आली असून मृतकाचे नाव आकाश पाचे वय 29 वर्षे व मुकेश खैरे वय 29 वर्षे दोन्ही राहणार मरारटोली कामठी असे आहे.तर सदर दोन्ही मृतक हे अविवाहित आहेत हे इथं विशेष!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर दोन्ही मृतक हे मजूर म्हणून कार्यरत असून घटनेच्या दिवशी कसमावरून परत आल्यानंतर घरून बाहेर पडले तर काही क्षणातच त्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडल्याने सर्वाना एकच धक्का बसला. दोन्ही मृतदेहाच्या पार्थिवावर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.