– इन कॅमेरा साडेतीन हजार बॉटल रिकाम्या
नागपूर :- न्यायालयाच्या आदेशाने एक लाख 53 हजार 343 रुपये किंमतीचा दारूसाठा सोमवारी दुपारी नष्ट करण्यात आला. लोहमार्ग पोलिस ठाण्यात नियमानुसार इन कॅमेरा तीन हजार 443 बॉटल रिकाम्या करण्यात आल्या. यासाठी पोलिस कर्मचार्यांची चांगलीच धावपळ झाली.
2017 ते 2023 या सहा वर्षातील दारूसाठा लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या मालखान्यात जमा होता. यात 12 गुन्ह्यातील दारूसाठा सुरक्षित ठेवला होता. न्यायालयाने जप्त दारूसाठा नष्ट करण्याचे आदेश दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस उपनिरीक्षक धनराज राउत यांच्या उपस्थितीत पंचनामा करून पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्या नेतृत्वात मालखाण्याचे मोहरीर हेड कॉन्स्टेबल किशोर चांभारे, पंकज देशमुख, गजानन शेळके, राकेश तिडके, सुनील बुधे, धर्मेद्र ढोरे यांनी 90 एमएल, 180 एमएल आणि 750 एमएलच्या 3 हजार 443 दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्या. रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या विक्री करून ती रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यत येणार आहे.