नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा येथील बिर मार्शल हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या सुचनेवरून ते राणी भोसले नगर झोपडपट्टी, नागपूर येथे गेले असता पठानचे घराजवळील गल्ली मध्ये एक ईसम हातात शस्व घेवुन लोकांना शिवीगाळी करून धमकावित असताना दिसला, विट मार्शल यांनी इतर सहकारी यांचे मदतीने लगचे त्यास ताब्यात घेवुन त्याचे जवळील लोखंडी सत्तूर काढून घेतला, आरोपीस त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव सोनू उर्फ कट्टर श्याम कोहळे, वय २७वर्षे, रा. राणी भोसले नगर झोपडपट्टी, नागपूर असे सांगीतले, आरोपीचे ताब्यातून एक लोखंडी सत्तूर किंमती २००/-रू. चा जप्त करण्यात आला. आरोपी हा घातक शस्त्र बाळगुन समक्ष धुमधाम करताना मिळुन आल्याने व त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, पोलीस ठाणे सक्करदरा येथे पोउपनि. टेकाडे यांनी आरोपीविरूध्द कलम ४, २५. भा.ह.का., सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
घातकशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com