नागपूर :- एकात्म मानवतावादाचे प्रणेते, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या १०७ व्या जयंतीदिनी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सोमवारी २५ सप्टेंबर रोजी प्रभाग २६ मधील हिवरी लेआउट येथे पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन केले.
यावेळी पंकज काळबांडे, दिनेश तंत्रपाळे, सुधीर गिरधर, सचिन चव्हाण, रमेश खंडारे, काशिनाथ बोकडे, प्रभाग अध्यक्ष राजेश संगेवार, प्रभाग अध्यक्ष सुरेश बारई, प्रभाग अध्यक्ष अशोक देशमुख, बोथप्रमुख मोसमी वासनिक, भटक्या विमुक्त मोर्चा संयोजक किशोर सायगन, सलील अंसारी, बोथप्रमुख विक्रम डुंभरे, नागपूर जिल्हा मनपा कर्मचारी पत संस्थेचे मुख्य प्रवर्तक लोकेश मेश्राम आदी उपस्थित होते.
पंडीत दीनदयाल उपाध्याय यांची जयंती अंत्योदय दिवस म्हणून साजरी केली जाते. पंडीत दीनदयाल उपाध्याय यांनी समाजातील गरीब आणि कमकुवत व्यक्तींच्या विकासातूनच खरा विकास साध्य होणार असल्याची संकल्पना मांडली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेत केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीच्या सरकाने देशातील तळागाळातील, कमकुवत शेवटच्या व्यक्तीच्या उत्थानासाठी अनेक योजनांचा आधार निर्माण केला आहे. त्यामुळे आणि ग्रामिण भागातील व्यक्ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत, असे मत यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी व्यक्त केले.