नागपूर :- तान्हा पोळा तसेच मारबत महोत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागपूर शहरात दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी मद्य विक्रीच्या सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिले आहेत.
शहरातील सर्व नमुना-ई,सीएल-3,एफएल-2, एफएल डब्लु-२, सीएलएफएलटिओडी-3, एफएल -3, एफएलबीआर -2, टड-१ ह्य अनुज्ञप्त्या १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहतील. आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.