नागपूर :- उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी जनतेशी संवाद साधला व निवेदने स्वीकारली. नागपूर पूर्व विधानसभा मतदार संघातील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातील सहभागानंतर फडणवीस यांना भेटण्यासाठी व आपल्या समस्या मांडण्यासाठी नागपुरच्या विविध भागातील नागरिक आले होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी येथील त्यांच्या कार्यालयात नागरिकांची भेट घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांची निवेदने स्वीकारली.
विविध सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडल्या. उपमुख्यमंत्र्यांनी या सर्वांची निवेदने स्वीकारत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा जनतेशी संवाद
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com