संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कांग्रेसतर्फे तहसिलदारला सामूहिक निवेदन सादर
कामठी :- कामठी तालुक्यातील सोयाबीन पिकावर पिवळा मोझ्याक व चक्रीभुंगा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास 80 टक्के शेतपिकाचे नुकसान झालेले आहे.तेव्हा कामठी तालुक्यातील नुकसानग्रस्त झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाईचा आर्थिक मोबदला शासनातर्फे देण्यात यावा या मागणीसाठी आज कांग्रेसतर्फे माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या नेतृत्वात व जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे,कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे ,कामठी पंचायत समिती सदस्य सोनुताई कुतथे यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी तहसीलदार अक्षय पोयाम यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
कामठी तालुक्यातील अनेक गावामध्ये शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकावर शेंगांच्या अवस्थेमध्ये पिवळा मोझ्याक व चक्रीभुंगा सारख्या विषाणूजन्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.या रोगाचे प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकावर बियाणे, पेरणी,फवारणी आदींसाठी मोठा खर्च केल्यानंतरही पीक हातात येणार नाही या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पीक पूर्णता नष्ट होण्याच्या स्थितीत आहे .यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून जवळपास 80 टक्के सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे तेव्हा प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ प्रति एकरी 50 हजार रुपये इतका आर्थिक मोबदला देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
याप्रसंगी अनुराग भोयर,सुधीर शहाणे, नवलकिशोर दडमल , कृष्णाजी करडभाजणे, प्रकाश गजभिये, मनोज कुथे,जगदीश पौनीकर, अनंता वाघ, निलकंठ भगत, विनोद शहाणे, शांताराम ठाकरे, विजय शिंदेमेश्राम, कोमल तट्टे, मधुकर ठाकरे, होमराज गोरले, देवेन्द्र येंडे , अतुल चौधरी ,नानाजी झाडे, योगेश झोड, गणेश पारधी, अमोल मोहोड ,प्रफुल डाफ, प्रफुल उदापुरे, बाल्याभाऊ दुरुगवार, मंगेश गुरघुसे ,शरद गोरले ,दिलीप झाडे, देवीदास राऊत व शेतकरी बांधव व ईतर नागरीक मोठया संख्येनी उपस्थित होते.