संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-खोट्या कागदपत्रांचे आधारे जमिनीचा एन ए ऑर्डर मिळविल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल
कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या घोरपड ग्रामपंचायत हद्दीतील शेत नं 148/अ/3 आराजी 1.94 हे.आर जमिनीचा विक्री करारनामा 2011 मध्ये आरोपीच्या वडिलांनी दिलीप आसवानी व इतर यांच्यासोबत केला होता याबाबत जाणीव असूनही आरोपीने फिर्यादी राजेंद्रसिंह यादव यांच्याशी त्याच जमिनीचा 24 जानेवारी 2017 रोजी विक्री करारनामा केला. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे कळताच याबाबत आरोपीला विचारणा केली असता आरोपीने फिर्यादिस जीवे मारण्याची धमकी दिली तसेच तहसील कार्यलयात खोटे कागदपत्रे पुरवून कामठी तहसील दारकडून जमिनीचा एन ए ऑर्डर मिळावीले असे फसवणुकीचे कृत्य केल्या बाबत स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून 18 नोव्हेंबर 2022 ला गुन्हा दाखल होणे अपेक्षीत होते मात्र पोलीस विभागाकडून कारवाही होत नसल्याने फिर्यादीने न्यायालयात अर्ज सादर केले यावरून प्रथमवर्ग न्यायालय कामठी ने दिलेल्या आदेशानुसार आरोपी सुशील यादव वय 48 वर्षे रा भिलगाव कामठी विरुद्ध कलम 156(3) अंनव्ये सीआरपीसी कलम 120(बी),420,468,471,472,473, 34,506 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी राजेंद्रसिंह यादव व आरोपी सुशील यादव यांच्यात 24 जानेवारी 2017 रोजी घोरपड येथील शेत क्र 148/अ/3आराजी 1.94 हे आर जमिनीचा विक्री करारनामा करण्यात आला होता परंतु सदर जमिनीचा विक्री करारणामा याआधीच आरोपीचे वडीलाने दिलीप आसवाणी व इतर यांच्यासोबत सन 2011 मध्येच केलेला होता याची जाणीव होत आपली फसवणूक झाल्याचे कळताच आरोपी सुशील यादव यांच्याशी विचारणा केली असता आरोपीने राजेंद्रसिंह यादव यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.तसेच आरोपी सुशील यादव व इतर आरोपीने खोटे व बनावट भाग नकाशा व उपयोग प्रमाणपत्र यादव नगर रचनाकार नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नागपूर यांची खोटी सही करून एकच जावक क्र 2 जानेवारी 2019 प्रमाणे त्यात वेगवेगळा मजकूर(कृषी ऐवजी निवासी) टाकून उपरोक्त नमूद घोरपड शेत क्र 148/अ/3 जागेचा अकृषक सारा आदेश (एन ए ऑर्डर 9जानेवारी 2019 ला प्राप्त केला. यामध्ये कामठी चे तत्कालीन तहसीलदार बाबासाहेब टेळे यांनी नगर रचनाकार नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नागपूर यांच्याकडून सदर प्रकरणात कोणत्याही प्रकारचा कार्यालयीन अहवाल प्राप्त केला नाही व आरोपीने पुरविलेल्या खोट्या कागदपत्राचे आधारे अकृषक सारा आदेश (एन ए ऑर्डर)दिला.सदर प्रकरणात आरोपी सुशील यादव सह इतर आरोपी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.